मुंबई : आगामी काही काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका त्याचबरोबर विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी प्रसिद्धी मिळवण्यासाठी राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर टिका करताना दिसत आहेत. यामध्ये विरोधी पक्षाकडून सातत्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका टिप्पणी करताना दिसत आहेत. अशातच आता मनसे नेते गजानन काळे यांनी देखील अशाच प्रकारची टिप्पणी शरद पवार यांच्याबाबत केली आहे.
अपक्ष डाव टाकणार की डाव साधणार?; चंद्रकांत पाटलांचे मोठे विधान
मागील एका महिन्यापासून राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि मनसेमध्ये जोरदार राजकीय संघर्ष बघायला मिळत आहेत. मनसेकडून टिका टिप्पणी झाली की त्याला लगेचच राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रत्युत्तर देत आहेत. त्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. अशातच पुन्हा एकदा पंतप्रधानपदावरून शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न गजानन काळे यांनी केला आहे.
आमदार लक्ष्मण जगतापांची रूग्णालयातून घरात जोरात एन्ट्री, विरोधक मात्र कोमात
गजानन काळे म्हणाले की, 60 वर्ष सत्तेच्या राजकारणात असून देखील मोजून फक्त राष्ट्रवादीचे 4 खासदार आहेत. जाणता राजांच्या कोल्हापुरच्या सभेला भाड्याच्या गर्दीतून लोक निघून जाताना महाराष्ट्राने पाहिले. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या 2 जिल्हाचा पक्ष व स्वप्न पंतप्रधान होण्याची, असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. राजसाहेबांच्या सभेला लाखों लोक स्तब्ध असतात. जंत पाटलांना सुबु्द्धी दे देवा, असं म्हणत त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांना टोला लगावला आहे.
राज्यसभेसाठी भाजपचे पारडे जड; भाजपच्या गळाला आणखी तीन आमदार..!
दरम्यान, मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात फिरताना दिसत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत कार्यकर्त्यांना पत्रक घरोघरी वाटण्याचे आदेश दिले. मात्र चेंबुरमधील काही मनसे सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यावर जंयत पाटलांनी मनसेवर खोचक टोला देखील लगावला आहे. घरोघरी पत्रकं वाटण्या इतपत मनसे हा काही मोठा पक्ष नाही, असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
Read also:
- “निवडणुकांसाठी जो पैसा आणला जातो, त्याचा इडीने तपास करायला हवा”; संजय राऊत
- राज्यसभेची 3 री जागा लढविण्यावर भाजप ठाम; धनंजय महाडिकच विजयी होणार?
- “फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली”; भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून उमेदवार मागे घेणार का?
- राज्यसभेची जागा सोडा, विधान परिषदेची जागा घ्या ; महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर
- राज ठाकरेंच्या आदेशानंतर पत्रकं वाटायला गेलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याला अटक