ठाणे : एकीकडे भाजपने मंदिरे उघडण्यासाठी ‘शंखानाद’ आणि ‘घंटानाद’ आंदोलन छेडले असताना, दुसरीकडे मनसेही दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर, ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी मंडप आणि स्टेज उभारणीचे काम सुरू असताना पोलिसांनी त्यावर कारवाई करून काम बंद पाडून, मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना कोविड नियमांचं उल्लंघन केल्यामुळे नौपाडा पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.
“एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
दरम्यान, यावरून आता मनसेचे सरचीटणीस संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला इशारा दिला असून, “ठाण्यात जर दहीहंडी उत्सवाला पोलीस आडकाठी करणार असतील, तर दादरमध्ये आपण दहीहंडी करू, अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे, त्यामुळे हा वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे, या ट्विटची दखल घेत दादर पोलीस, देशपांडे यांच्या शाखेवर दाखल झाले असून, त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
जर ठाण्यात दही हंडी साजरी करू दिली नाही तर दादर मध्ये साजरी करू
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2021
“राज्यात राजकीय कार्यक्रमांना गर्दी होते ती चालते, मग हिंदू सण साजरे करायला बंदी का?” असा सवाल त्यांनी उपस्थित करत मनसेने राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता. दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. त्यानुसार नौपाडा मधल्या भगवती मैदानावर मनसेने दहीहंडी कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यास सुरुवात केली होती. मात्र पोलिसांनीकाम थांबवण्याचे आदेश दिल्यानंतर, मनसैनिकांनी आंदोलन, घोषणाबाजी सुरू केली आणि मग पोलिसांनी जाधव यांना ताब्यात घेतले.
दहीहंडी साजरी करणार! मनसे-पोलीस आमने-सामने, पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडी सरकारला, खासकरून हिंदुत्ववादी मतदारांवर भिस्त असलेल्या शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न यातून सुरु आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण मराठीच्या मुद्द्यासोबत आता मनसेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरही गेल्या काही दिवसांपासून आपले लक्ष केंद्रीत केले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या दोन पक्षांतला राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे.
Read Also :
- ईडीच्या कारवाईनंतर शिवसेनेच्या गोटात घडामोडींना वेग, अनिल परब संजय राऊतांच्या भेटीला
- मोठी बातमी : शिवसेना नेते अनिल परब यांच्याशी संबंधित तीन मालमत्तांवर EDची धाड
- “महाविकास आघाडी सरकारला फक्त नोटांचा आवाज ऐकू येतो”, चंद्रकांत पाटील यांचा घणाघात
- “राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, हि विकृती कधीही आहे, जाणार नाही”
- “हिंमत होती म्हणून लढलो, तुमच्यासारखा पक्ष सोडून केंद्रीय मंत्री झालो नाही”, मलिकांचा हल्लाबोल