मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर जवळजवळ १५ महिन्यानंतर त्यांच्या आमदार निधीचा पहिल्यांदाच वापर केला असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक विकास निधी योजनेअंतर्गत ही रक्कम दादरमधील शिवाजी पार्कच्या सुशोभिकरणासाठी वापरण्यात येणार आहे. दरम्यान, यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान आणि अमित शहांची भेट का झाली नाही? चंद्रकांत पाटील यांनी दिले सारवासारवीचे उत्तर
“२०१२ नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकरांचा झाला आहे का? दुसऱ्यांचे कार्यकर्ते, नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प चोरला आहे. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?,” असा सवाल संदीप देशपांडे यांनी ट्विट करत केला आहे.
2012 नंतर शिवसेना पक्ष हा उचलेकारांचा झाला आहे का?दुसऱ्यांचे कार्यकर्ते ,नेते, नगरसेवक चोरणे, शिवतीर्थावरील जलसंचय प्रकल्प, सेल्फी पॉईंट आणि आता तर राजसाहेबांच्या संकल्पनेतून दरवर्षी साकारला जाणारा विद्युत रोषणाई प्रकल्प. चोरी करायची तर स्वखर्चाने तरी करा ती पण जनतेच्या पैशांनी?
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 10, 2021
मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा निधी दिला असल्याने, या भागातील नागरिकांची मते आपल्या खिशात घालण्यासाठी हा डावपेच असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. दरम्यान, मनसेच्या स्थापनेनंतर दादर आणि शिवाजी पार्क या भागांतील शिवसेनेचे राजकीय बळ कमी झाल्याचे दिसून येत होते. बाळासाहेब ठाकरेंनी देखील यावरून नाराजी दर्शवली होती.
राज ठाकरेंसोबत बैठकीतला ‘निरोप’ दिल्लीत पोहोचला; चंद्रकांत पाटलांचा मोठा खुलासा
२२ एकरात पसरलेल्या दादर पार्कचे आणि शिवसेनेचे ऐतिहासिक नातं आहे. बाळासाहेबांची भाषणं, दसरा मेळावा हे या ठिकाणी भारत असत. आता मुख्यमंत्र्यांनी आमदार निधीतून पैसे दिल्यानंतर महापालिकेने या कामासाठी निविदा मागवली आहे. यात लाइट बिलबोर्ड्स, विद्युत दिवे, पथदिवे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळील रोषणाई, पुतळ्यावरील स्पॉट लाईट्स आणि इतर शुशोभिकरणाची कामं केली जाणार आहेत.
Read Also :
- प्रताप सरनाईकांनाच्या कामाशी बरोबरी करून दाखवा, मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना आव्हान
- मोठी बातमी : अकरावीची सीईटी परिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द; राज्य सरकारला धक्का
- महादेव जानकरांचा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडेंना मोलाचा सल्ला, म्हणाले “आता त्यांनी ठरवायचं दुसऱ्यांच्या घरात…”
- मंत्रालयात आढळलेल्या दारूच्या बाटल्यांबाबत उच्च स्तरीय चौकशी करून संबंधितांवर तातडीने कठोर कारवाई करा!
- मंत्रालयात झाली गटारी? मोठ्या प्रमाणात सापडल्या दारूच्या बाटल्या…