मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीवरुन मनसेने निशाणा साधला आहे. कुणाला कंटाळा आला, म्हणून लॉकडाऊन उठवता येणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुन मनसेने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
‘कुणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉक डाउन काढता येणार नाही–मुख्यमंत्री 100%सहमत पण कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून वाढवता ही येणार नाही’, असं ट्विट मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केलं आहे.
कुणाला कंटाळा आला असेल म्हणून लॉक डाउन काढता येणार नाही–मुख्यमंत्री 100%सहमत पण कुणाला मंत्रालयात जायचा कंटाळा आलाय म्हणून वाढवता ही येणार नाही —महाराष्ट्राची जनता
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) July 26, 2020