मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत अंतर्गत वाद सुरू झाले. याच वादावरून शिवसेनेत दोन गट पडल्याचे समोर आले. यानंतर शिवसेनेचे धनुष्यबान चिन्ह कोणाला मिळणार याचा ही वाद सुप्रिम कोर्टापर्यंत गेला आहे. यातच धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाचं मिळणार असल्याचा दावा शिंदे गट वारंवार करत आहे. शिंदे गटाकडे पक्षाचा मोठा गट असल्याने धनुष्यबाण गटाला मिळण्याची शक्यता आहे. अशात आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी ट्विट करत शिवसेनेला डिवचले आहे.
“आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही तेवढं आम्ही राजकारण केलंय”; रामदास कदमांचं ठाकरेंना प्रत्युत्तर
रेल्वे इंजिन भाड्याने दया म्हणुन उपदेश देणाऱ्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे, असं ट्विट करत शालिनी ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने मनसेचे 6 नगरसेवक फोडले. यावेळी शिवसेनेने मनसेने इंजिन भाड्याने दया असा टोला लगावला होता. याचाच बदला आता मनसेनी घेतला आहे. दरम्यान, काही दिवसांपुर्वी आदित्य ठाकरे यांना मनसेच्या एका स्टेटमेंटबद्दल विचारण्यात आले असता. त्यांनी आपण संपलेल्या पक्षावर बोलत नाही असं त्यांनी म्हटले होते.
“पुणे महापालिकेत 100 पेक्षा नगरसेवक निवडून आणून फडणवीसांना गिप्ट देणार”; जगदीश मुळीक
राज्यातील सत्तांतरापूर्वी राज ठाकरे यांचा मनसे पक्ष आणि भाजपमधील जवळीक वाढली होती. एकनाथ शिंदे यांनीही बंड केल्यानंतर राज ठाकरे यांनी फोनवरून संवाद साधला होता. तर मनसेच्या एकमेव आमदार राजू पाटील यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक विश्वासदर्शक ठरावावेळी शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने मतदान केले होते.
“आढळराव पाटलांची सेनेतून बाहेर पडण्याची वेळ चुकली”; सचिन अहिरांचं वक्तव्य
शिंदे सरकारमध्ये मनसे नेते अमित ठाकरे यांना मंत्रिपदाची चर्चा सुरू आहे. यावर पत्रकारांनी, तुम्हाला मंत्रिपद हवं आहे का? मनसेला दोन मंत्रिपदे देणार आहेत यावर आपलं मत काय, असे विचारले असता अमित ठाकरे म्हणाले की, सरकारमध्ये गृहमंत्रिपद मिळाल्यास सरकारमध्ये सामील होऊ, असे म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित ठाकरे यांनी मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. यावर राज ठाकरेंनी ही अफवा असल्याच माध्यमांना स्पष्ट सागितले आहे.
रेल्वे इंजिन भाड्याने द्या म्हणुन उपदेश देणार्यांवर धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आली आहे.🏹#शिवसेना #धनुष्यबाण #रेल्वेइंजिन #निष्ठायात्रा #udhavthackrey #AdityaThackeray #adityathakrey
— Shalini Thackeray (@ThakareShalini) July 21, 2022
Read also
- “शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”
- “शिवसेना सोडली, तेव्हा पक्षप्रमुखांनी नारायण राणेंना मारण्यासाठी अनेक सुपाऱ्या दिल्या”
- गृहमंत्रिपद मिळाल्यास तरच सरकारमध्ये सामील होऊ; अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- “जरंडेश्वर कारखान्याची 10000 कोटींची बेनामी संपत्ती लवकरच ताब्यात घेऊ”; अजित पवारांना शिंदे गटाच्या आमदारांनी ललकारलं
- “मग त्यांनी ‘या’ दाढीला पकडलं, अन्..;”खैरेंचा एकनाथ शिंदे अन् फडणवीसांवर हल्लाबोल