मुंबई – मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यासाठी मनसेनं जोरदार आंदोलन केलं. पण, राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. महाविकास आघाडी सरकारने आमच्या अनेक कार्यकर्त्यांना पोलीस बळाचा वापर केला आणि छळ केला असा आरोप मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी केला आहे.
काॅंग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची उमेदवारी; वंचितने दिला चर्चेंला पुर्णविराम
मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी एक फेसबुक पोस्ट शेअर करून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.”महाविकास आघाडी’सल्तनत’ लाख बुरा चाहे तो क्या होता है? वही होता है जो मंजूर ए कानून होता है.'” अशी सुरुवात करत त्यांनी या फेसबुक पोस्टद्वारे ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे
उद्धव ठाकरेंच्या मास्टर सभेअगोदर, फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक, शिवसेनेला घेरणार
नितीन सरदेसाई यांची फेसबूक पोस्ट –
2 मे पासून महाराष्ट्रातील मविआ सल्तनत ने आम्हा महाराष्ट्र सैनिकांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लावला होता. अनेकांना स्थानबद्ध केले, अनेकांना अटक केली, जेल मध्ये टाकले, आमच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास दिला (अजूनही देत आहेत). या व अशा अनेक प्रकारे आमचे मानसिक खच्चीकरण करण्याचे प्रयत्न झाले पण आमचे महाराष्ट्र सैनिक या सगळ्याला पुरून उरले. जेल भोगली, तडीपारी भोगली आणि कोणताही अनुचित प्रकार न करता महाराष्ट्रातील अनाधिकृत भोंग्याचा आवाज बंद करून सुद्धा दाखवला.
महाराष्ट्रातील ‘सल्तनत’ ने पोलिसांवर दबाव टाकून नको त्या गुन्ह्यांची कलमे लावून आमच्या महाराष्ट्र सैनिकांना अडकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण आम्ही जसे रस्त्यावर संघर्ष करून न्याय मिळवतो त्याच प्रमाणे आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा तेवढ्याच ताकदीने लढुन, संघर्ष करून, न्याय मिळवण्यात यशस्वी झालो.
म. वि. आ. सल्तनतच्या या दमनशाहीला अंगावर घेऊन, महाराष्ट्रातील जनतेला आवाजाच्या त्रासातून मुक्त करणार्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझा सलाम !!
कायदेशीर प्रक्रियेत महाराष्ट्र सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार्या सर्व वकील मंडळी व महाराष्ट्र नवनिर्माण जनहित कक्ष यांचे विशेष आभार.
आपले सहकारी अडचणीत असल्याने त्यांच्या सुटकेसाठी धावपळ करणार्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना साष्टांग दंडवत.
शेवटी एवढंच सांगेन, आम्हाला दाबायला जेवढी ताकद लावाल त्याच्या दुप्पट वेगाने आम्ही उसळी घेऊ…लावा ताकद…..
Read also:
- “तूर्तास अयोध्याचा भोंगा स्थगित करून नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू”
- मनसेचा अयोध्या दौऱ्याला स्थगिती; राष्ट्रवादी, काॅंग्रेस अन् शिवसेनेची राज ठाकरेंवर टोलेबाजी
- राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित; ब्रीजभूषण सिंहांची पहिली प्रतिक्रिया
- “ठाकरे सरनेम होनेपर भी वो ब्रिजभूषण से डर जायेगा”; राष्ट्रवादीने अयोध्या दौऱ्यावरून मनसेला डिवचलं
- “महिला पोलिसाला धक्का लागला असेल तर राजकारण सोडून देईन”; संदीप देशपांडेंचं खुलं आव्हान