ठाणे : महापालिकेतील सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर, अनधिकृत फेरिवाल्याने कारवाई दरम्यान जीवघेणा हल्ला केला आणि यात त्यांच्या डाव्या हाताची बोटे कापली गेली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेदरम्यान, स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी संबंधित हल्लेखोराला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याने तोच चाकू स्वतःच्या गळ्यावर ठेवून धमकवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला मोठय़ा शिताफीने पकडून अखेर पोलीसांच्या स्वाधीन केले गेले.
अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
दरम्यान, या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांच्या बाबतीत पत्रकार परिषदेत, “यांची मस्ती उतरवली पाहिजे. जेव्हा बोट छाटली जातील आणि फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल. यांची हिंमत होतेच कशी? सुटून आल्यावर तो मार खाईल,” असा इशारा दिला होता. यांनतर आज त्यांनी रुग्णालयात जाऊन कल्पिता पिंपळे यांची भेट घेतली. यावेळी, त्यांनी प्रकृतीची विचारपूस केली. तसेच, “लवकर बऱ्या व्हा, बाकी आम्ही बघतो”, असं आश्वासन दिल्याचं सांगितलं.
“यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” निर्बंधांवरून राज ठाकरेंची जळजळीत टीका
तसेच, या भेटीनंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, “मी आश्वासन वगैरे दिलेलं नाही. मी तब्येतीची विचारपूस केली. आमचं आंदोलन अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात आहे. मी काल म्हटलं तसं, जे घडलं त्याचं दु:ख आहेच पण काळ सोकावतोय. अशा प्रकारची हिंमत ठेचून काढणंच गरजेचं आहे. पोलिसांकडून कारवाई सुरु आहेच पण न्यायालयहि आपलं काम करेल, अशी पूर्ण अपेक्षा आहे. त्याला कठोर शिक्षा होईल,” असं मत वाक्य केलं.
मंदिरं दीर्घकाळापासून बंद, अण्णा इतके दिवस कुठं झोपले होते? राज ठाकरेंची चपराक
कासावडवली येथील मार्केट परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाईसाठी महापालिकेच्या, माजिवडा मानपाडा सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या गेल्या असता, त्यांच्यावर एका फेरीवाल्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला. या घटनेत त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली असून, त्यांना वाचवयला पुढे आलेल्या अंगरक्षकाही त्याने हल्ला केला. या हल्ल्यात त्याचे देखील एक बोट कापले गेले. कल्पिता पिंपळच्या बोटांवर यशस्वी शस्त्रक्रीया झाली असून, सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
Read Also :
- यात्रा आणि आंदोलन करणाऱ्या भाजप-मनसेला मुख्यमंत्र्यांनी फटकारले, म्हणाले…
- व्यस्त होते तरी परबांनी चौकशीला जायला हवे होते, चंद्रकांत पाटलांचे सूचक भाष्य
- घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा पण आमचा नाद करु नका – किशोरी पेडणेकर
- ‘हे’ नियम पाळून पुणेकर साजरा करू शकतात गणेशोत्सव; पोलिसांकडून आचारसंहीता जाहीर
- बोंबलून आशीर्वाद मिळत नाहीत, कामातून आशीर्वाद मिळतात – उद्धव ठाकरे