पुणे – पुण्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दबंग नेत्या, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष, माजी नगरसेवक डॉ. रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षस्रेष्टींकडे पाठवत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे. त्यांच्या राजीनाम्याने पुणे शहरात मनसेला खिंडार पडले आहे.
रुपाली पाटील ठोंबरे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत आणि हे निश्चित झालं आहे. त्या उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत घड्याळ बांधणार आहेत.
मनसेतील ठोंबरेच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले ‘असं’ काही…
ठोंबरेंच्या राजीनाम्यामुळे जी पोकळी मनसेमध्ये निर्माण झाली होती ती भरून काढण्याचा प्रयत्न पुण्याचे मनसेचे नेते आणि गटनेते वसंत तात्या मोरे यांनी केली आहे. तात्यांनी त्यांचा. मनसे प्रमुख राज ठाकरे, नगरसेवक साईनाथ बाबर असा तिघांचा फोटो व्हायरल करत एक आशय या फोटोसोबत लिहला आहे.
यात लिहले आहे की मनसेला कोणीही सोडून गेलं तरी मनसेला काहीही फरक पडणार नाही. पुणे मनसेत वसंत तात्या मोरे आणि साईनाथ बाबर हे नेहमीच मनसेचे पक्षाध्यक्ष राज साहेब ठाकरे यांच्यासोबत राहणार आहेत.
हिंदू वोट बँकेचं माहित नाही मात्र शिवरायांनी पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं – सजंय राऊतांचा टोला
रुपाली ठोंबरेंना एकप्रकारे आव्हान देण्याचे काम एका बाजूला वसंत तात्यांनी केले आहे आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ बाबर यांचे मनसेतील वजन वाढवण्याचा हा प्रकार आहे असं देखील राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. आता रुपाली पाटील ठोंबरे वसंत मोरेंना काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also :
- “..या लढ्याचे नेतृत्व करणारे आ. महेश लांडगे यांचे अभिनंदन”; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया
- “आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नामुळेच बैलगाडा शर्यत परत सुरू”; योगेश टिळकर यांनी केले कौतुक
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश