पुणे: पुढच्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने प्रमुख राजकीय पक्षांचे नेते पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यांमध्ये महापालिका निवडणुकांची रणनीती ठरविण्याचे काम नेत्यांकडून होत आहे. भाजप शिवसेनेसह अन्य पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
हे पण वाचा: मुख्यमंत्री वारंवार सांगूनही ऐकत नसेल, तर मी मातोश्रीसमोर जाऊन बेशरमाचं झाड लावणार?
हे पण वाचा: बैलगाडीवरून पडल्याने खिल्ली उडवणाऱ्या भाजपा नेत्यांना भाई जगताप यांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणतात…
यातच आता पुणे महापालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही जोमाने कामाला लागली आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी खुद्द पक्षाध्यक्ष राज ठाकरे (मैदानात उतरले असून कालपासून दोन दिवस ते पुण्यात मुक्कामाला असणार आहेत. राज ठाकरे काल पुण्यात दाखल झाले आहेत.
हे पण वाचा: बीडमध्ये मुंडे समर्थकांचे राजीनामे देत नाराजी व्यक्त, तर दुसरीकडे राणे समर्थकांचा जल्लोष
कोरोना संकटकाळात अनेक क्षेत्रांतील व्यक्तींनी राज ठाकरे यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडल्याचे संपूर्ण राज्याने बघितले. तसेच राज ठाकरेंनी केलेल्या एका फोनवर अनेकांची कामे झाल्याचेही जनतेने पाहिले. यामुळे जनतेच्या मनातील विश्वास कायम राखण्यासाठी तसेच पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी मनसेने तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात दाखल झाले आहेत.
हे पण वाचा: “जनता हुशार आहे, पण आता मुक्या जनावरांनाही कळतंय ‘गाढवांचा’ भार उचलायचा नाही!”
आज आणि काल ते मुक्कामी आहेत. मनसेच्या शहर कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचसोबत मनसेच्या काही प्रमुख नेत्यांसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहेत. तसेच यानंतर पुढील आठवड्यात ते तीन दिवसीय नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. १६ ते १८ जुलै या कालावधीत ते नाशिक येथे असतील. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचे हे दौरे महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.