नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील, तसेच देशभरातील ओबीसी आरक्षणाला घेऊन मोठा वादंग निर्माण झाला आहे. मात्र आता केंद्र सरकार, मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर, देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याच्या प्रयत्नात असून, देशातील वैद्यकीय प्रवेशात ओबीसींना २७% आरक्षण लागू करण्याचा आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: आरोपी जामिनावर बाहेर आले तरी वनविभागाची चौकशी संपेना
आर्थिक दृष्ट्या सर्व मागासांना आरक्षण देण्याचा पंतप्रधानांचा प्रयत्न आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. भाजपमधील एक मोठा गट ओबीसी आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळेच या मुद्द्याकडे मोदी विशेष लक्ष देत आहेत. त्यामुळे मोदींनी आर्थिकदृष्ट्या मागासांनाही वैद्यकीय प्रवेशात राखीव जागा ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच, ऑल इंडिया कोटातून ओबीसांना वैद्यकीय प्रवेशात एमबीबीएससह पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीही आरक्षण देण्याच्या सूचना त्यांनी दिल्याचे समजते आहे. त्यामुळे ओबीसींच्या वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून, आता लवकरच याबाबतचा अध्यादेश केंद्राकडून जारी करण्यात येणार आहे, असं सूत्रांनी सांगितलं आहे.
थांब रे, मध्ये बोलू नको, फडणवीसांसमोरच नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापले
पंतप्रधानांनी हा निर्णय उ.प्रदेशात पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे बोलेल जात आहे. महामारी काळात, ज्याप्रकारे उ.प्रदेश सरकारची आणि भाजपची प्रतिमा लोकांच्या मनात ढासळली आहे. ती सुधारण्यासाठी आणि सत्तादेखील कायम राखण्यासाठी आधी, जास्तीत जास्त ओबीसी मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश केल्यानंतर, आता हा निर्णय घेण्यात आल्याने, ओबीसींच्या व्होटबँकेवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; पण एका मतदारसंघासाठी केवळ एकच तास
सध्या १५ % युजी, ५० % पीजी मेडिकल सीट, राज्य सरकारांद्वारे ऑल इंडिया कोटानुसार मॅनेज केल्या जातात. त्यात एससी आणि एसटीसाठी जागा आरक्षित आहेत. पण ओबीसींसाठी यात जागा आरक्षित नाही. मात्र आता या निर्णयामुळे देशातील हजाराच्यावर विदयार्थ्यांना फायदा होणार असून, दुसरीकडे यामुळे दरवर्षी महाराष्ट्रातील 700 ते 800 ओबीसी विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
Read Also :
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- नागपूर येथील निर्बंध शितील करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचे पत्र
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी
- ‘आम्हीही व्यवस्थेचा भाग, लोकशाहीची थट्टा करु नका’, राऊतांच्या टिकेला प्रवीण दरेकरांचे प्रत्युत्तर