मुंबई : राज्यात सध्या मनोरा आमदार निवास प्रकरणावरून चांगलेच राजकारण तापत असलेले पाहायला मिळत आहे. यावरून सध्या भाजप आणि सत्ताधारी यांच्यात एकमेकांवर आरोप – प्रत्यारोप सुरु असून, भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून काल राज्य सरकारवर टीका केली होती.
दरम्यान, आता काँग्रेसककडून यावर पलटवार करण्यात आला असून, काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.
सत्ता हव्यासापोटी मविआ सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा @BJP4Maharashtra पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बाधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या NBCC ला काम दिले. @BhatkhalkarA यांनी प्रकल्प किंमत ₹९०० कोटी कशी आली ही
माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 9, 2021
“सत्ता हव्यासापोटी आघाडी सरकारला बेफाम आरोपांनी बदनाम करणारा भाजप पुन्हा उघडा पडला आहे. मनोरा पुनर्बांधणीचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला व मोदी सरकारच्या एनबीसीसीला काम दिले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रकल्प किंमत 900 कोटी कशी आली ही माहिती न घेता भ्रष्टाचार झाला ही बोंब ठोकली, अशी टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) May 9, 2021
तसेच, मोदी सरकारच्या एनबीसीसी कंपनीने अकार्यक्षमतेकरिता काढले जाण्यापूर्वी 28 फेब्रुवारी 2020 ला विधिमंडळाला दिलेल्या ई-टेंडर नोटीस मसुद्यामध्ये प्रकल्प किंमत 810 कोटी सांगितली. नंतर 8 डिसेंबर 2020 रोजी याच कंपनीने प्रकल्पाची किंमत अंदाजपत्रकात 875.62 कोटीं इतकी वाढवली. आता ठेकेदारांची तांत्रिक पूर्व अर्हता निविदा सुरू आहे. ठेकेदारांची पात्रता प्रकल्प किंमतीपेक्षा अधिकची असते. मोदी सरकारच्या एनबीसीसीने भ्रष्टाचार केला का? फडणवीसांनी भ्रष्टाचारी कंपनीची नियुक्ती केली का? भाजपाने उत्तर द्यावे व निर्लज्जपणे खोटे आरोप केल्याबद्दल तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे.
Read Also :
- “आगामी काळात काँग्रेस निवडणूक लढणार…”, नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य
- सीबीआय, एनआयए पाठोपाठ आता एसीबी देखील मागे, परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ
- आदित्यला मंत्रिपद दिलं त्याच तत्परतेने बहुजनांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, पडळकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- आरोग्यमंत्र्यांवर होतोय “हा” आरोप, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे चौकशीचे आदेश
- “सांगा योग्य कोण? पंतप्रधान की तुम्ही?”, फडणवीसांना जयंत पाटलांचा थेट सवाल