पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रविवारी देशाच्या नवीन संसदेचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला देशातील १९ राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे सध्या राज्यात एव्हाना देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार जुंपली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“..तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ?” नितेश राणेंना रूपाली पटालांचा खोचक टोला
अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपुजन करतानाही कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता इमारत तयार झाली आहे. अस शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भाजप ही अजगर, मगरीसारखी..!सोबत गेलेल्यांना भाजपाने खाऊन टाकले”
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते, पण राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोमाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये, अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आताही वेळ गेली नाही, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर त्यांचे स्वागत करू,” केंद्रीय मंत्र्यांची ठाकरेंना ऑफर
हेही वाचा…बच्चू कडूंनी अमरावतीवर दावा ठोकला, विधानसभेच्या जागांचा आकडा ही सांगितला, कडू सरकारविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत
हेही वाचा…“कॅबिनेट मंत्रीपदासाठी पडळकर-राणेंमध्ये स्पर्धा, विरोधकांवर टिका करा अन् मंत्रीपद मिळवा”
हेही वाचा…“फडणवीसांना ‘मुख्यमंत्र्यांची’ गाडी चालवावी लागते, त्यांची दया, कीव येते”
हेही वाचा…गौतमीच्या आडनावावरून वाद, सुषमा अंधारेंची वादात उडी, माधूरी दिक्षीत, ममता कुलकर्णी अन् माधुरी पवारांचं नाव घेऊन…