अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या का नाही यावरून यूजीसी आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. त्यातच आता मध्य प्रदेश सरकारने यावर पर्याय म्हणून थेट घरी बसून परीक्षा देण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे विद्यार्थी थेट घरूनच परीक्षा देणार आहेत.
मध्य प्रदेशच्या शिवराज सरकारने महाविद्यालयांच्या अंतिम परीक्षांसाठी ओपन बुक प्रणालीचा उपाय शोधला आहे. सप्टेंबर महिन्यात ही परीक्षा पार पडणार असून, यूनिव्हर्सिटीकडून विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रश्नपत्रिका पाठवली जाईल, ज्याची उत्तरे घरात बसूनच उत्तरपत्रिकेत लिहावी लागणार आहे.
ओपन बुक प्रणाली म्हणजेच थेट पुस्कात बघून उत्तरे लिहिता येतील. यात मिळवलेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज आणि मागील वर्षांत मिळवलेल्या गुणांचे 50 टक्के वेटेज यावरुन विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. उत्तरे लिहिल्यानंतर उत्तरपत्रिका ईमेल आणि पोस्टाद्वारे देखील पाठवता येतील.