अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या सासऱ्यांना कोरोना झाल्याची माहिती काळ समोर आली होती. मात्र आता खासदार नवनीत कौर राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या कुटुंबातील सात जणांना कोरोनाची लागण झाली आहे.नवनीत राणा यांच्या सासऱ्यांपाठोपाठ आणखी सहा जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले
आमदार रवी राणा यांच्या वडिलांसोबतच आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या अशा एकूण सात जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आमदार रवी राणा यांच्या घराचा संपूर्ण परिसर सॅनिटाईज करण्यात आला आहे.
दरम्यान, ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आमदार रवी राणा यांनी सॅनिटायझर, मास्क आणि धान्य वाटण्यासाठी एप्रिल महिन्यात दौरे केले होते. नवनीत कौर राणाही यामध्ये सहभागी होत्या.