कर्जत : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर या प्रश्नावर मोर्चा काढण्याच्या मुद्यावरून चंद्रकांत पाटील आणि संभाजीराजे आमने सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. यात आता ‘मी राष्ट्रपती नियुक्त खासदार असून, चंद्रकांत पाटलांनी मला शिकवू नये’, असे सणसणीत उत्तर खासदार संभाजीराजे यांनी दिले आहे.
संभाजीराजे यांनी मोर्चाची घोषणा केली होती. हे प्रसारमाध्यमांनी दाखवलं, वृत्तपत्रात आलं आहे. जर हे खोटं असेल तर त्यांनी त्यांनी प्रसारमाध्यमांवर खटला दाखल करावा. त्यांना वकिल लागले तर मी देण्यास तयार आहे. संभाजीराजे हे भाजपचे खासदार असल्याचे मान्य जर करत नसले तरीही ते ऑन पेपर भाजपचे खासदार आहे, अशी आठवण चंद्रकांत पाटलांनी करू दिली होती. त्यांच्या या टीकेला आता संभाजीराजे यांनी उत्तर दिले आहे.
संभाजीराजे म्हणाले की, मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझी नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झालेली नाही. चंद्रकांत पाटील यांनी मला काही शिकवू नये. मी शाहू महाराजांचा वंशज आहे.
मला कोणी शिकवण्याची गरज नाही. 2007 सालापासून मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढा देत आहे आणि हे जनतेला माहीत आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांचे यात योगदान काय? मराठा आरक्षण लढय़ात पाटील केव्हा आले हे मला तरी काही आठवत नाही, असे जोरदार टोला लगावतानाच राज्य सरकारकडे आम्ही पाच मागण्या मांडल्या आहेत. या मागण्या सरकारने तातडीने मंजूर कराव्यात. या मागण्या मान्य केल्या नाही तर आम्हाला पुणे ते मुंबई विधान भवन असा मराठा मोर्चा काढावा लागेल, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
Read Also :
- ‘प्रशांत किशोरांच्या नका लागू नादी, 2024 मध्ये पंतप्रधान बनणार आहेत मोदी’
- ‘…म्हणून महाराष्ट्रात पेट्रोल सर्वात महाग आहे’, पेट्रोलियममंत्र्यांनी सांगितले कारण
- ‘…तर येत्या आठ दिवसांत पुन्हा कडक निर्बंध लावणार’
- गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर पाळत, पोलिसांना तपासाचे आदेश
- कंत्राटदाराला घातली कचऱ्याने आंघोळ, संतप्त शिवसेना आमदाराचे प्रताप