महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे म्हणजे खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. सुप्रिया सुळे यांचे लाडक्या दादावरील प्रेम सर्वश्रुत आहे दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला.
सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते. याबाबतचा व्हिडिओ सुप्रिया सुळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून शेअर केला आहे.