मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आज 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्या टप्प्यात शिंदे गटाकडून 9 तर भाजपकडून 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. पुजा चव्हाण प्रकरणात चर्चेत असलेले संजय राठोड यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे तर अलिकडेच टीईटी परिक्षा घोटाळ्यात अब्दुल सत्तारांच नावं चर्चेत होतं. त्यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यावरून आता राष्ट्रवादीने सोशल मीडियावर नव्या मंत्र्यांवर असलेल्या आरोपांबाबत, घोटाळ्यांबाबत, तसेच गुन्हांबाबत पोस्टर टाकले आहेत.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात अपक्ष आमदारांना डावललं; बच्चू कडूंची भूमिका काय?
काॅंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले राधाकृष्ण विखे पाटलांना देखील एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे पाटलांनी ऑक्टोबर 2014 ते जुन 2019 मध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिले आहे. त्यांची ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड झाली होती. त्याआधी त्यांनी भाजपवर कडाडून टिका केली. भाजपला गॅंग ऑफ वासेपुर ही उपमा देणारे हे महोदय आता भाजपमध्ये विसावले असं म्हणत राष्ट्रवादीने राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.
TET घोटाळ्याची टांगती तलवार; तरी देखील अब्दुल सत्तारांना शिंदे सरकारमध्ये लागली लॉटरी
राधाकृष्ण विखे पाटलांनी याआधी कृषी व पणन, जलसंधारण, शालेय शिक्षण, गृहनिर्माण, विधी व न्याय, दुग्धविकास आणि पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय, परिवहन, बंदरे खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे. ते 1995 पासून सलग पाच वेळा विधानसभेच्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यामुळेच त्यांना आता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात सामील करून घेतले आहे.
एकनाथ शिंदें सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी; शिंदेकडून 8 तर भाजपकडून 8 मंत्री
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पहिल्या टप्प्यात शिंदे गटातील शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, दीपक केसरकर, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार, दादा भुसे, उदय सामंत, संजय राठोड यांना संधी देण्यात आली आहे. भाजपाकडून गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, सुरेश खाडे, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे, विजयकुमार गावित यांना संधी देण्यात आली आहे.
शिंदे – फडणवीस सरकारचे शपथ घेतलेले मंत्री#मंत्रिमंडळविस्तार #MaharashtraCabinetExpansion@RVikhePatil pic.twitter.com/wL4Q1wA9Ze
— NCP (@NCPspeaks) August 9, 2022
Read also
- “उशीरा का होईना, पण शपथविधी झाला”; मंत्रिमंडळ विस्तारावर अजित पवारांचा टोमणा
- “शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरमच्या मुहुर्तावर मंत्रिमंडळाचा विस्तार”; शिवसेनेची टिका
- ABVP कार्यकर्ता ते कॅबिनेट मंत्री; चंद्रकांत पाटीलांची राजकीय कारकिर्द एकदा वाचाच
- “ज्योतिषाचा व्यवसाय सोडून चंद्रकांत पाटील विज्ञानवादी व सत्तार हिंदूत्वासाठी काम करतील”
- “योगायोगाने रक्षाबंधन जवळच, चित्राताई आता पवित्र झालेल्या भावाला नक्की ओवाळतील”