अहमदनगर: महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. राज्यातील साखर कारखानदारीत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झालेले आहेत. आता त्यांची चौकशी सुरु केली जात आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यानंतर आता राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांवर कारवाई होण्याची शक्यता वाढलेली आहे. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेला मुळा सहकारी साखर कारखान्याने उसाला २८०० रुपये भाव द्यावा अन्यथा गेटवर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आला आहे.
हे पण वाचा, पारनेर कारखाना पुन्हा सहकारात रुजू करण्यासाठी आमदार निलेश लंकेचे एक पाऊल पुढे
हे पण वाचा, अहमदनगर जिल्ह्यातील ‘पारनेर साखर कारखाना’ चौकशीच्या भोवऱ्यात
महाराष्ट्र प्रदेश भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद बेलेकर यांना भेटून तसे निवेदन देण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी भेंडा येथील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर बाळासाहेब मुरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली ऊस दरवाढीसाठी उपोषण करण्यात आले होते. आता भारतीय जनता पक्षाने आपला मोर्चा मुळा कारखान्याकडे वळविला आहे आणि आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.
हे पण वाचा, अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या कारखान्यवर कारवाईचा बडगा; ईडीकडून जप्तीचे आदेश
हे पण वाचा, ‘आर या पार’ अगस्ती कारखाना आम्ही वाचवणारच; विरोधकांना मधुकर पिचड यांचे खुले आवाहन
मागील गळित हंगाम मोठा झाला असून साखर कारखान्याच्या उपपदार्थ निर्मिती पण चांगल्या प्रमाणात झालेली आहे. केंद्र शासनाच्या धोरणानुसार एफआरपीप्रमाणे कारखान्याने २१०० रुपये भाव अदा केलेला आहे. मात्र भार्गव कमिटीच्या निकषानुसार उपपदार्थ निर्मितीतून पन्नास टक्के नफ्यातून शेतकरी सभासद वर्गाला २८०० रुपये ऊसदर देण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आलेली आहे. येत्या आठ दिवसांत मुळा कारखान्याच्या पदाधिकारी व व्यवस्थापनाने २८०० रुपये भाव देण्याबाबत निर्णय न घेतल्यास भाजपा किसान मोर्चाच्या वतीने मुळा कारखान्याच्या गेटवर १२ जुलै सकाळी अकरा वाजता उपोषण करण्यात येईल असा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
हे पण वाचा,
अगस्ती सहकारी साखर कारखान्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग; सर्व संचालकांनी दिले राजीनामे
“जयवंत शुगर्सचा दुसरा हफ्ता १५० रूपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग” संस्थापक डॉ. सुरेश भोसले
शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
कुकडीच्याही पाण्यात मशाल पेटली, न्यायालयीन लढ्यासाठी कुकडी संघर्ष समिती स्थापन
राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
“निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील