मुंबई : राज्यात आगामी निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगानं नवीन प्रभागरचनेचा आराखडा आज राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याला मान्यता दिली तर नव्याने मुंबई महापालिकेत नऊ प्रभागांची भर पडणार आहे. मुंबईतील प्रभागसंख्या 326 झाल्याने निवडणुकीतील जागांचे समीकरणही बदलण्याची शक्यता आहे.
गोळ्या खायची वेळ आली तर पहिले मी खाईल; रेल्वेच्या नोटिसीवरून खासदार श्रीकांत शिंदे आक्रमक
मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान तीन प्रभाग वाढवल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, शहरभागात लोअर परळ, वरळी सारख्या नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. तर, पूर्व उपनगरांत मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे आणि पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात प्रभाग वाढवले जाऊ शकतात.
भाजपपाठोपाठ शिवसेनेचीही गोव्यासाठी यादी जाहीर; प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरणार
याबाबतचा प्रभाग पुर्नरचनेचा आराखडा निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. शहरातील 2011 च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या 11 वर्षांच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन या प्रभाग पुर्नरचनेचा निर्णय करण्यात आला आहे.
अमोल कोल्हेंच्या भूमिकेतून नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण होऊ नये – बाळासाहेब थोरात
मुंबई महापालिकेचा कार्यकाळ फेब्रुवारी 2022 मध्ये संपत आहे. त्यामुळे त्यावेळीच निवडणूक होणे अपेक्षित आहेत. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुबई महापालिकेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असतं. याच मुंबई महापालिकेची निवडणूक येत्या मार्च महिन्यात होण्यची शक्यता आहे. फक्त मुंबई महापालिकेचीच नाही तर राज्यातील इतर 14 महानगरपालिकांच्या निवडणुका मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसेच 26 जिल्हा परिषदांच्या निवडणुका मार्च महिन्यात घेण्याचा निवडणूक आयोगाचा मानस असल्याच्या चर्चा आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचा झेंडा फडकला होता. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांपैकी शिवसेनेनं 97 जिंकल्या होत्या. तर, भाजपला 83 जागा मिळाल्या होता. यावेळी भाजपकडूनही मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. तसेच काँग्रेसही स्वबळावर उतरण्याची शक्यता आहे.
Read also:
- पर्रीकरांना पणजी हवी असल्यास ते शक्य नाही; देवेंद्र फडणवीसांचे स्पष्टीकरण
- अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही; नाना पटोले आक्रमक
- कोल्हेंच्या नथूराम गोडसेंवर राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांच मतं काय? जयंत पाटील म्हणतात…
- अमोल कोल्हेंचा नथुराम गोडसे वादात; भाजपकडून पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- नथुराम गोडसेंची भूमिका: शरद पवारांकडून खासदार अमोल कोल्हेंच समर्थन… म्हणाले…