नाशिक : मुंबई महापालिका वगळता राज्यातील इतर सर्व महापालिका निवडणुकीसाठी आता तीन सदस्यीय प्रभाग रचना राहणार आहे. नाशिक महापालिकेच्या एकूण 122 जागा आहेत. त्यानुसार एकूण 41 प्रभाग असणार आहेत. त्यातील 40 प्रभाग हे तीन सदस्यांचे असतील, तर एक प्रभाग हा 2 सदस्यांचा असेल. त्यामुळे, महाविकास आघाडी मोट बांधणार का? की स्वतंत्र लढणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण, शिवसेनेची खरे तर दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. त्यामुळे, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये काहीशी नाराजी दिसून येत आहे.
प्रवीण दरेकरांना रंगलेल्या गालाचा ‘मुका’ प्रकरण भोवलं; रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल
नाशिक शहराची 2011 च्या जनगणनेुसार 14 लाख 86 हजार लोकसंख्या आहे. ही आकडेवारी गृहीत धरूनच प्रभागांची रचना केली जाईल. त्यात सुमारे 36 हजारांचा एक प्रभाग असण्याची शक्यता आहे. त्यानुसार 40 प्रभाग हे तीन सदस्यीय, तर एक प्रभाग हा 2 सदस्यीय असेल. यापूर्वी 2007 च्या निवडणुकीतही तीन सदस्यीय प्रभाग रचना होती. त्याचा फायदा भाजप-शिवसेनेला झाला होता. त्यांच्याच बाजूने मतदारांनी कौल दिला होता. आता यावेळेसही हा फायदा भाजप-शिवसेनेला होईल, अशी शक्यता आहे. विशेषतः नाशिकमध्ये भाजपला बहुसदस्यीय प्रभाग रचना पथ्यावर पडणार आहे. शिवसेनेची खरे तर दोन सदस्यीय प्रभाग रचनेची मागणी होती. मात्र, शिवसेनेचे संघटन कौशल्य आणि हवा निर्माण करण्याच्या पद्धतीमुळे ते सहज तरून जाऊ शकतात. यात खरी कोंडी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची होऊ शकते. कारण प्रत्येक प्रभागात तीन उमेदवार देणे, तितकी चांगली माणसे पक्षात शोधणे, हे आव्हानात्मक मानले जात आहे. त्यामुळेच राज्याप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही महाविकास आघाडीची मोट बांधली जावू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सव्वा रुपयाऐवजी ही रक्कम वाढवायला हवी; चंद्रकात पाटलांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली
प्रभाग रचनेचा निर्णय झाल्यापासून महापालिका निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले इच्छुक कामाला लागले आहेत. त्यांनी मतांच्या जमवाजमवीची गणिते मांडायला सुरुवात केली आहे. खरे तर यापूर्वीच अनेकांनी आपापल्या भागातील मतदारांमध्ये संपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. त्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजनही केले जात आहे. आता सारेच चित्र स्पष्ट झाल्याने आगामी काळात या कामाला गती येणार आहे.
Read Also :
- महापालिका रणधुमाळी २०२२: भाजप-राष्ट्रवादीचा विजयाचा दावा, काँग्रेसमध्ये मतभेद, आघाडीत बिघाडी कोणाची?
- २०२२ च्या महापालिका निवडणुकासाठी 3 सदस्यांचा प्रभाग होणार; राज्य मंत्रीमंडळाचा मोठा निर्णय
- किरीट सोमय्यांचा पुन्हा कोल्हापूरला येण्याचा मुहूर्त ठरला; राजकीय वाद पेटण्याची शक्यता
- उद्धव ठाकरेंचे सल्लागार, अधिकारी अतिशय अपरिपक्व; मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरून देवेंद्र फडणवीस आक्रमक
- राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, सावित्रींच्या लेकींचे गाऱ्हाणे ‘मातोश्री ‘ ऐकणार का? – महिला आमदाराचे पत्र