मुंबई : गेल्या वर्षाभरापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत कोर्टात आज याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र पुन्हा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याने निवडणुकाही पुढे जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी-चिंचवडसह २३ महापालिकांवर प्रशासकीय सावट कायम आहे.
हेही वाचा…उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सावंतवाडी महाअधिवेशनाचे निमंत्रण
महाविकास आघाडीच्या काळात प्रभाग रचना, लोकसंख्येत १० टक्के वाढ धरून निश्चित केलेली सदस्यसंख्या आणि ओबीसी आरक्षण यावरून तब्बल ५७ वेगवेगळ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यावर एकत्रित सुनावणी बुधवारी होणार होती, मात्र बुधवारी होणाऱ्या याचिकांच्या सुनावण्यांच्या यादीत या याचिकांचा समावेश करण्यात आलेला नाही. आता २८ जानेवारीला या सुनावणीची शक्यता आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहित एकनाथ शिंदेंनी घेतला मोठा निर्णय
दरम्यान, प्रभाग रचना करणे, त्यावर हरकती सुचनांची प्रक्रिया आणि अंतिम प्रभाग रचना यासाठी किमान ९० दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जानेवारी अखेरपर्यंत निवडणुकांसंदर्भात निकाल न लागल्यास एप्रिल-मे महिन्यात निवडणूका घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका थेट सप्टेंबर-ऑक्टोंबर मध्येच घ्याव्या लागतील. अशी स्थिती आहे.
हेही वाचा…पालकमंत्र्यांचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यांनंतरच सुटणार का ?
हेही वाचा…मोठी बातमी…! वाल्मिक कराडला पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
हेही वाचा…दावोसमध्ये महाराष्ट्राची विक्रमी गुंतवणूक..! इतक्या कोटींची झाली गुंतवणूक
हेही वाचा…ठाकरे गटाचे ४ आमदार अन् ३ खासदार फुटणार, बड्या नेत्याचा बडा दावा
हेही वाचा…उत्साहपूर्ण वातावरणात अजिंठा – वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप संपन्न