नागपूर : राज्यातील धार्मिक स्थळं खुली करण्यासाठी भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून आज सकाळपासूनच राज्यात विविध ठिकाणी सरकारविरोधी आंदोलनं सुरू आहेत. पुणे, पंढरपुर, नाशिक, औरंगाबाद, नागपूरमध्ये भाजपकडून निदर्शनं सुरू आहेत. तर काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांचा विरोधाला झुगारून थेट मंदिरात शिरण्याचाही प्रयत्न केला आहे. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वात पुण्यात कसबा गणेश मंदिराबाहेर घंटानाद आंदोलन सुरू आहे.
मंदिरं उघडण्यासाठी भाजप आक्रमक; पुण्यात कसबा तर पंढरपुरात विठ्ठल मंदिरात कार्यकर्ते घुसले
दरम्यान, भाजपच्या या आक्रमक पावित्र्यांनंतर आता, सत्ताधारी महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी देखील यावर भाष्य केले असून, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. “मंदिरे बंद करण्याचा निर्णय हा राज्य सरकारचा नाही, तर केंद्र सरकारचा आहे. आम्ही फक्त त्यांच्या सूचनांचे पालन करत आहोत,” असं सांगत त्यांनी, “भाजपने शुद्धीत येऊन बोलावं, बेधुंद वक्तव्ये करू नयेत,” असे बोल लागावले आहेत. ते आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत होते.
टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नको? मुख्यमंत्री ठाकरे धर्मयुद्धासाठी तयार राहा; भाजप आक्रमक
“केंद्र सरकारच्या आदेशानुसार मंदिरे उघडण्याचा प्रश्नच येत नाही. कारण सगळे अधिकार केंद्राकडे आहेत. त्यांनी निर्णय घेतला तर आम्ही उद्याच निर्णय घेऊ. केंद्राच्या सूचना या एका राज्यासाठी नसून, संपूर्ण देशासाठी आहेत. त्यामुळे, मते मिळवण्यासाठी लोकांच्या धार्मिक भावना भडकावणे हाच भाजपचा एकमेव उद्देश आहे. हा शंकानाद केंद्राच्या विरोधात असावा. कदाचित हा त्यांच्याच विरोधात असेल. कारण मंदिर न उघडण्याच्या सूचना केंद्राच्या आहेत,” असा जोरदार टोला त्यांनी भाजपला लगावला.
राज्यात कायद्याचं राज्य आहे, मग अनिल परब यांना स्वत:हून अटक करा – चंद्रकांत पाटील
“भाजपच्या भावना सगळ्यांना माहीती आहेत. देशात सर्वात जास्त गोमांस निर्यात करणारा आमदार भाजपचाच आहे. त्याच्या कंपनीला नाव मात्रं मुस्लिम दिलं आहे. एकीकडे गोहत्या करायच्या, दुसरीकडे त्यांचं संरक्षण करायचं अशी दुटप्पी भूमिका भाजपची राहिली आहे. त्यामुळे, भाजपने मंदिरे उघडण्याची मागणी मोदींनाच घालावी, म्हणजे मंदिरे सुरू होतील आणि भाजपला दिखावा करण्याची वेळ येणार नाही,” असा घणाघात त्यांनी केला.
Read Also :
- मोठी बातमी : शिवसेना मंत्री अनिल परब यांना ED ची नोटीस, ठाकरे सरकारला मोठा धक्का
- अनिल देशमुखांना क्लीनचीट मिळालेली नाही, चौकशी सुरुच आहे; सीबीआय’चा मोठा खुलासा
- नारायण राणे यांच्या दोन्ही मुलांना मारल्या शिवाय स्वस्त बसणार नाही; शिवसैनिकाच्या वक्तव्याने खळबळ
- तब्बल 20 वर्षानंतर गुलाबराव पाटील एकनाथ खडसेंच्या घरी गेले; काय होत नेमकं कारण? वाचा सविस्तर…
- जन आशीर्वाद यात्रेतून भाजप कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत आहे – अजित पवार