नागपुर : माझे कुटुंब माझी जबाबदारी आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच राहणार नाही. चाळीस आमदार सोडून गेले. अजून जे काही राहिले आहेत, तेही जातील अशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांना ठाकरे परिवाराशिवाय कोणी दिसत नाही, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्या टीकेचा कडक समाचार घेतला. ते नागपूर येथे पत्रकारांशी बोलत होते.
शिवतीर्थावरील परवानगी ठाकरेंना नाकारली, अंधारे म्हणाल्या, “काल फक्त ट्रेलर होता, एवढ्यात घाबरलात ?”
एखादा माणूस खूप घाबरला की, मनातली भिती दिसू नये यासाठी मोठमोठ्याने बोलतो. त्या पद्धतीने आपली भिती बाहेर दिसू नये यासाठी उद्धव ठाकरे अशी वक्तव्ये करत आहेत. उद्धव ठाकरे यानी मुख्यमंत्रिपदाच्या काळात अडीच वर्षे सूडभावनेने विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न केला. आजही ते सुधारलेले दिसत नाहीत. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विचार त्यांनी स्वीकारल्यामुळे अजूनही ते सूडबुद्धीचे राजकारण करत आहेत. त्यांचे सूडबुद्धीचे राजकारण फार काळ टिकणार नाही. असंही बावनकुळे म्हणाले.
“उरलेला तुमचा करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू”; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
काल शिवसेना प्रमुखांचा पक्ष मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझ्या घराण्यावर बोल आहेत. पण मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे, पण भाजपवाल्यांचा वंश कोणता? असा सवाल करीत इतके उपरे घेतले की, 52 कुळे आहेत की, 152 कुळे हेच समजत नाही असा चिमटा देखील त्यांनी भाजपाचा काढला. त्याचबरोबर त्यांनी भाजपचा उल्लेख पुन्हा एकदा कमळाबाई म्हणून केला. या कमळाबाईंशी मुंबईचा संबंध काय ? असा सवाल करीत यांच्यासोबत आमची युतीमध्ये 25 वर्ष सडली असं पुनर्च्चार देखील त्यांनी केला.
“महापालिकेच्या सत्तेत असंख्य यशवंत, कीर्तिवंत भ्रष्टाचाराचे राक्षस उभे केलेत”; मनसेची टिका
भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार राहा. अमित शहांवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे. असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “उद्धव ठाकरेंनी कालचं भाषण दारू पिऊन केलंय”; अन् नारायण राणेंची जीभ घसरली
- “हिमंत असेल तर शिंदे गटातील आमदारांना भाजपानं पक्षात विलीन करावं”; भास्करराव जाधव
- “आज बोटं मोजताय, उद्या बोटं मोडाल, आदर देतोय, आदर घ्या…;” मनसेचा शरद पवारांवर निशाणा
- “तेव्हा दोन तास मला गुंतवणुकदारांसाठी काढायला लागायचे पण आता…”; शरद पवार
- “ठाकरेंना गिधाड अन् गरूडामधलं फरक माहित नाही, अमित शहा हे गरूड आहेत”; भाजपचं प्रत्युत्तर