नागपूर: राष्ट्रावादी काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिवसाच्या अगोदर नगरसेवक दुनेश्वर पेठे यांची नागपूर शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली होती. अनिल अहिरकर यांच्या राजीनाम्यानंतर या पदासंदर्भात लाँबिंग वाढली होती. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पेठे यांना ३ जून रोजी तयार झालेले नियुक्ती पत्र सोपविले होते. यांचाच अर्थ पेठे यांच्याकडे राष्ट्रवादीची धुरा सोपविण्याचा निर्णय अगोदरच झाला होता. दुनेश्वर पेठे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जोरदार धक्का बसला आहे. नागपूर जिल्ह्यात भंडारा-गोंदियाच्या वाढत्या हस्तक्षेपाने देशमुख समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, ते कोणालाच ‘पटेल’ असे सध्यातरी दिसत नाही.
हे पण वाचा, संभाजीराजे छत्रपती आज कोपर्डीत; बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेणार
हे पण वाचा, ‘अजितदादा म्हणतात कोण लाल आहे जो सरकार पाडेल, मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत’
नागपूर जिल्ह्यातील नियुक्त्यांबाबत अनिल देशमुख यांना नेहमीच विश्वासात घेतले जात होते. त्यांचा शब्द अंतिम मानला जायचा. वरिष्ठ पातळीवरून एखाद्याला नियुक्ती द्यायची झाली तर त्यांना विचारणा केली जायची. यावेळी मात्र त्यांचे कट्टर समर्थक माजी अध्यक्ष व विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर यांना थेट राजीनामा द्यायला लावण्यात आला. त्याचवेळी दुनेश्वर पेठे यांना नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
हे पण वाचा, ‘चंद्रकांत पाटलांना उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यावर बघू’
हे पण वाचा, ‘भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक, पण…’
पेठे हे अहिरकर यांना हटविण्याची वारंवार मागणी करीत होते. अनिल देशमुख यांच्याहीकडे त्यांनी तक्रारी केल्या होत्या. वारंवार विरोधात जात असल्याने मध्यंतरी देशमुख आणि पेठ यांच्यात मतभेदही झाले होते. मात्र, देशमुख निवडून आले. त्यांना राष्ट्रवादीने महत्त्वाचे गृहखाते दिले. त्यामुळे पेठे यांनी पुन्हा त्यांच्याशी जुळवून घेतले. या दरम्यान राष्ट्रवादीने विदर्भात विस्तार करण्याचे ठरवले. प्रफुल पटेल यांना विदर्भाची जबाबदारी देण्यात आली. प्रशांत पवार यांनी त्यांना पक्षात आणले. त्यांना अध्यक्षपद देण्याचेही जवळपास ठरले होते. मेट्रो रेल्वेच्या विरोधातील वादग्रस्त आंदोलन, त्यानंतर लागलेल्या लॉकडाउनमुळे त्यांचे नाव मागे पडले.
देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’
परमबीरसिंग यांच्या आरोपामुळे देशमुख यांना गृह खात्याचा राजीनामा द्यावा लागला. ही संधी साधून त्यांच्या पक्षांतर्गत छुप्या विरोधकांनी खच्चीकरणा करण्याचे प्रयत्न सुरू केले. पेठे यांची अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना पहिला झटका देल्याचे समजते. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांना कायम ठेवून देशमुख समर्थकांची कोंडी केली जात असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख व समन्वयक म्हणून पटेल यांचे कट्टर समर्थक माजी आमदार राजू जैन यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे. तेव्हापासूनच देशमुख विरोधक ‘प्रफुल्लित’ झाले होते.
हे पण वाचा,
‘अजूनही वेळ गेली नाही, अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरेंनी विचार करावा!’
‘त्यांचं माहिती नाही पण आम्ही मात्र निवडणूका स्वतंत्रपणे लढवणार’ – नाना पटोले
‘‘माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छु काम आहे’’ अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना धरले धारेवर