नागपूर – विधान परिषदेच्या नागपूर जिल्हा स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी भाजपने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रिंगणात उतरवले. त्यामुळे विनोद तावडे नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील भाजप कडून पुनर्वसन होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून ही निवडणूक लढायला कोणीही फारसे उत्सूक नसल्याने शेवटल्या क्षणाला भाजप नगरसेवक छोटू भोयर (रविंद्र भोयर) यांना काँग्रेसमध्ये आयात करून त्यांना उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.
एसटी महामंडळ कुणाच्या बापाजाद्याची जहागिरी नाही; गोपीचंद पडळकरांनी सरकारला खडेबोलं सुनावलं
छोटू भोयर हे भाजपमधून आल्याने ते भाजपच्या मतांना सुरुंग लागेल या आशेने काँग्रेसने त्यांना रिंगणात उतरायची तयारी दाखवली. आज चंद्रशेखर बावनकुळे हे उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि इतर नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.
भाजपवर नाराज असलेले विदर्भातील नेते छोटू भोयर (रवींद्र भोयर) यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. छोटू भोयर यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भोयर रेशीमबाग प्रभागाचे नगरसेवक होते. आज ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपसाठी 34 वर्षांपासून झटत आलो आहे. मात्र त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला, मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं भोयर यांनी सांगितलं.
‘पक्षाने विश्वास टाकला, सर्वांचे आभार, विधिमंडळात पुन्हा जोमाने काम करणार’
भोयर यांची आईही भाजपाची नगरसेविका होती, संघ परिवार परिवाराच्या अतिशय जवळचे संबंध आहेत. काँग्रेसकडून कोणीही लढायला इच्छुक नसल्याने शेवटी काँग्रेस नेत्यांना भाजपच्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी द्यावी लागते.
पुढे रवींद्र भोयर म्हणाले की, भाजपला वाढवण्यासाठी दिवस-रात्र काम केलं. अनेक नवीन लोकांना पक्षात आणले, त्याच भाजपमध्ये माझा छळ करण्यात आला. मला दाबण्यात आलं आणि त्यामुळेच पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.आजच मी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. काँग्रेसकडून अद्यापही विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी कुठलाही शब्द देण्यात आलेला नसल्याचंही भोयर यांनी सांगितलं आहे.
Read Also :
- कोनशिलावर राष्ट्रवादीच्या मंत्र्याच नावं चुकलं; अजित पवारांनी चक्क डोक्यालाच हात लावला
- प्रज्ञा सातव यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड आता निश्चित; भाजपचा उमेदवारी अर्ज मागे
- ST संपाच्या तोडग्यासाठी आता पवारांचा पुढाकार; परब आणि अजित पवारांसोबत गुप्त बैठक
- ट्विट का जवाब ट्विटसे: मलिकांच्या ट्विटला वानखेडेंचे हिंदू संस्कृतीचे पालन करणारे फोटो टाकत सणसणीत उत्तर
- कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपला ‘जोर का झटका’; सहा नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश