पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीची उत्सुकता आता शिगेला पोहचू लागली आहे. अद्याप निवडणूक कधी होणार हे स्पष्ट नसलं तरी सोमवारी प्रारूप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार धानोरी-विश्रांतवाडी हा पहिला प्रभाग असणार आहे. सर्वाधिक प्रतिक्षा या प्रभागांची हद्द कशी असेल, याची असून एक फेब्रुवारीला रात्री बारा वाजल्यानंतर ती पाहता येणार आहे.
भाजपच्या नेत्यांची मुले काय चणे-शेंगदाणे, ढोकळा विकतात का? संजय राऊतांचा सवाल
कोणता प्रभाव कसा होणार याची चर्चा सुरू असताना सोमवारी पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारुप प्रभाग रचनेच्या 58 प्रभागांची नावे जाहीर झाली आहेत. शहरातील पहिला प्रभाग हा धानोरी-विश्रांतवाडी असून सर्वात शेवटचा 58 क्रमांकाचा प्रभाग कात्रज-गोकुळनगर हा आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या नावानेही सुमारे 10 प्रभाग तयार झालेले आहेत. तसेच यामध्ये प्रस्थापित नगरसेवकांचे, पक्षनेते व पदाधिकाऱ्यांचे प्रभाग सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
असे आहेत पुण्यातील प्रभाग :
- धानोरी – विश्रांतवाडी
- टिंगरेनगर – संजय पार्क
- लोहगाव – विमान नगर
- वाघोली – इऑन आयटी पार्क
- खराडी – चंदननगर
- वडगावशेरी
- कल्याणीनगर – नागपूर चाळ
- कळस – फुलेनगर
- येरवडा
- शिवाजीनगर गावठाण – संगमवाडी
- बोपोडी – पुणे विद्यापीठ
- औंध – बालेवाडी
- बाणेर – सुस म्हाळुंगे
- पाषाण – बावधन बुद्रुक
- पंचवटी – गोखलेनगर
- फर्ग्युसन कॉलेज – एरंडवणे
- शनिवार पेठ – राजेंद्रनगर
- शनिवार वाडा – कसबा पेठ
- रास्तापेठ – के.ई.एम. हॉस्पिटल
- पुणे स्टेशन – ताडीवाला रोड
- मुंढवा – घोरपडी
- मांजरी – शेवाळवाडी
- साडेसतरानळी – आकाशवाणी
- मगरपट्टा – साधना विद्यालय
- हडपसर गावठाण – सातववाडी
- भीमनगर – रामटेकडी
- कासेवाडी – हरकानगर
- महात्मा फुले स्मारक – टिंबर मार्केट
- खडकमाळ आळी – महात्मा फुले मंडई
- जयभवानी नगर – केळेवाडी
- कोथरूड गावठाण – शिवतीर्थ नगर
- भुसारी कॉलनी – सुतारदरा
- बावधन खुर्द – महात्मा सोसायटी
- वारजे – कोंढवे धावडे
- रामनगर – उत्तमनगर शिवणे
- कर्वेनगर
- जनता वसाहत – दत्तवाडी
- शिवदर्शन – पद्मावती
- मार्केटयार्ड – महर्षी नगर
- गंगाधाम – सॅलीसबरी पार्क
- कोंढवा खुर्द – मिठानगर
- सय्यदनगर – लुल्लानगर
- वानवडी – कौसरबाग
- काळेपडळ – ससाणेनगर
- फुरसुंगी
- मोहम्मदवाडी – उरुळी देवाची
- कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
- अप्पर सुपर इंदिरानगर
- बालाजीनगर – के के मार्केट
- सहकारनगर – तळजाई
- वडगाव – पाचगाव पर्वती
- नांदेडसिटी – सनसिटी
- खडकवासला -नऱ्हे
- धायरी – आंबेगाव
- धनकवडी – आंबेगाव पठार
- चैतन्यनगर – भारती विद्यापीठ
- सुखसागर नगर – राजीव गांधी नगर
- कात्रज – गोकुळनगर
Read also:
- शिक्षण मंत्र्यांच्या घरासमोर विद्यार्थ्यांचं वादळी आंदोलन; पोलिसांचा आंदोलनकांवर लाठीचार्ज
- खुलेआम वाईन विक्रीतून सरकार नेमकं काय साध्य करणार? अण्णा हजारेंचा सवाल
- “संजय” ला आता दिव्यदृष्टी प्राप्त झाली का? मनसेची राऊतांवर खोचक टीका
- म्हापश्यातील कुठलाही वार्ड विकास कामांपासून वंचित राहिला आहे, असे कुणीही म्हणू शकत नाही – वायंगणकर
- नितेश राणेंचे स्वीय सहाय्य्क राकेश परब पोलीस ठाण्यात हजर; राणेंना जेल की बेल?