चंद्रपूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे, सध्या आगमी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षबांधणीसाठी आणि महामारीची स्थितीची पाहणी करण्यासाठी उत्तर विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी चंद्रपुरातल्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत त्यांनी, ‘चंद्रपूर महापालिकेत सत्ता असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांनी मनपात झालेल्या गैरव्यवहाराचे सबळ पुरावे आपल्याला दिले असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
हे पण वाचा, सरकार आमच्या भरोश्यावर; आम्ही सरकारच्या नाही; नाना पटोलेंचे ट्टिट
दरम्यान, भाजपकडून मात्र यावर, ‘आमच्या कोणत्याही नगरसेवकांनी पटोले यांची भेट घेतलेली नसून, केवळ भाजपची आणि भाजप नगरसेवकांची बदनामी करण्यासाठीच त्यांनी, राजकीय हेतूने या पत्रकार परिषदेत चुकीची माहिती दिली आहे,’ असे सांगत, त्यांच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हे पण वाचा, ‘काँग्रेस नेत्यांकडे काका-पुतण्यांसमोर मान हलवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही’
तसेच, याबाबत अधिक सविस्तर सांगताना, ‘पटोले यांच्याकडून हा दावा केवळ राजकीय हेतुसाठी केला गेला असून, त्यांनी ना भाजपच्या कोणत्याही नगरसेवकाचे नाव उघड केले आहे, की आमच्याकडून कोणी त्यांना याबाबत लेखी निवेदन दिले आहे. तसेच, दिले असेल तर ते कोणत्या तारखेस दिले आहे, हेसुद्धा त्यांनी या आरोपात नमूद केलेले नाही.
हे पण वाचा, ‘नाना, काँग्रेसला हे दोन्ही पक्ष भीक तरी घालतात का?’
त्यामुळे, या परिस्थितीचा भाजपच्या सर्वच नगरसेवकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही तक्रार दाखल करत आहोत,’ असे नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी पटोलेंविरुद्धच्या तक्रारीत म्हटले आहे. यावेळी, त्यांच्यासोबत उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेते संदीप आवारी उपस्थित होते.
Read Also :
- धनगर आरक्षणाचा कायदा करा, अन्यथा पंढरपूरात ठाकरेंच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ देणार नाही
- उद्याच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात प्रकाश आंबेडकरही सहभागी होणार
- आता ओबीसी समाजही आक्रमक, छगन भुजबळांच्या निवासस्थानी ठरली आंदोलनाची दिशा
- कोल्हापूरात उद्या मुक मोर्चा, कोणलाही उलट-सुलट बोलू नका – संभाजीराजे
- केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यातील ‘या’ दिग्गजांना मिळणार स्थान?