मुंबई – ज्या पद्धतीचे आक्षेप जे राज्यपालांनी केले होते. त्याबाबतचं स्पष्टीकरण राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलं आहे. त्यामध्ये विधानसभेचे कामकाज आणि विधिमंडळाचे नियम बदल आणि जे घटनात्मक अधिकार विधिमंडळाला आहेत. त्याप्रमाणे ही कारवाई करण्यात आली आहे. जे मुद्दे राज्यपालांनी मांडलेले होते. ते सगळे फोडून सरकारने राज्यपालांना विधानसभेच्या अध्यक्षाची निवड झाली पाहीजे. त्यासाठी पुन्हा एकदा पत्र पाठवण्यात आलेलं आहे. मात्र, महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपाची भूमिका आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी म्हटलं आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधिमंडळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी पटोले म्हणाले की,अद्यापही राज्यपालांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला नाहीये. पत्र किंवा प्रतिसाद आल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असं पटोले म्हणाले. संविधानिक पद्धतीने जी कारवाई करता येते त्या पद्धतीने ही कारवाई होईल. राज्यपालांकडून प्रतिसाद आल्यानंतर आम्ही प्रतिक्रिया देऊ, असं नाना पटोले म्हणाले.
विधानमंडळामध्ये ज्या नियमावलीत आम्ही बदल केले होते. ते नियम घटनाबाह्य आहे. अशा पद्धतीचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे. ते कसे बरोबर आहेत. त्यांचं विश्लेषण आम्ही त्यांच्यासमोर मांडलेलं आहे, असं पटोले म्हणाले.
…तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार; चंद्रकांत पाटील यांच मोठं विधान
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम सादर केला. त्यावर कायदेशीर बाबी तपासून उद्या सांगतो, असं आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या शिष्टमंडळाला दिलं होतं. मात्र, राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचं सांगितलं आहे.
Read also:
- अनिल देशमुखांच्या अडचणी संपेना; न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी १४ दिवसांची वाढ
- देवेंद्र फडणवीसांनी फिरवला फोन; नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, उद्या कोर्टात फैसला
- ” जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करतात”; चंद्रकांत पाटलांच्या दाव्यावर शरद पवारांनी दिले उत्तर
- एसटीच्या कामगारांवर केलेली बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही; अनिल परबांची स्पष्टोक्ती
- ठाकरे सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार; विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवर महाविकास आघाडी ठाम