पुणे : मी मोदीला मारू शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो, अशा वक्तव्याचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि येरवडा रुग्णालयात दाखल व्हा, अशी खोचक टीका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.
मेट्रोची पाहणी करायला शहरात शरद पवार आले, महापौरांना नाही बोलवले
महापौर मोहोळ म्हणाले, काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हा. तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य आहे. नावापुरता का होईना, पण ‘राष्ट्रीय’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये? असा संतापही महापौर मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. त्यांना तातडीने उपचारांची आवश्यकता आहे. महाराष्ट्र काँग्रेस स्वत:ची काळजी घेऊ शकत नाही त्यामुळे नानांच्या उपचारांसाठी आम्हीच पुढाकार घेऊन त्यांना ईलाजासाठी 1 हजार 1 रुपयांची मनी ऑर्डर करणार आहोत, अशी खोचक टीका जगदीश मुळीक यांनी केलीय. तसंच ‘नाना पटोले यांचे वक्तव्य म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न….आज नाना पटोले यांनी आज केलेले वक्तव्य अत्यंत लांछनास्पद आहे. त्यांनी त्यांची योग्यता ओळखून बोलावे. नाना पटोले यांना तज्ञांकडून मानसिक उपाचारांची गरज असून लवकरात लवकर त्यांनी मानसिक उपचार घ्यावेत’, असा सल्लाही मुळिक यांनी दिला आहे.
Read also:
- पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो; नाना पटोलेंचा यु-टर्न
- हिंमत असेल तर गोव्यातून निवडणूक लढवा; चंद्रकांत पाटलांचे राऊतांना खुले आव्हान
- नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, त्यांना तात्काळ अटक करा; नितीन गडकरी, नारायण राणे आक्रमक
- काँग्रेस हा लोकशाहीतील राजकीय पक्ष की दहशत पसरविणारे संघटन? पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप
- मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे आक्षेपार्ह वक्तव्य