राज्यात कोरोना महामारीचे संकट आहे. अशा स्थितीमध्ये नांदेड महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकांसाठी पुढील तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्यास व या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात आलेला आहे. या पदांचा अडीच वर्षाचा कालावधी 1 मे 2020 रोजी संपुष्टात आला आहे. मात्र आता पदांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.
या निवडणुका कोव्हिड-१९ च्या संक्रमणामुळे तीन महिने पुढे ढकलणे आणि विद्यमान महापौर, उपमहापौरांना मुदतवाढ देणे यासाठी अध्यादेश जारी करण्यात आला होता.
#मंत्रिमंडळनिर्णय
नांदेड महानगरपालिकेच्या विद्यमान महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुका पुढील तीन महिन्यांकरिता पुढे ढकलण्यासह या दोन्ही पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात अध्यादेशात सुधारणा करण्यास मान्यता.— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 23, 2020
हा अध्यादेश दि.27.04.2020 पासून अंमलात आला असून, 3 महिन्यांच्या कालावधीकरीता म्हणजेच दि.27.07.2020 पर्यंत सदर मुदतवाढ लागू आहे. उपरोक्त अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ दि.27 जुलै,2020 रोजी संपत असल्याने, तसेच अद्यापही राज्यामध्ये कोरोना व्हायरस संक्रमणाचा प्रादुर्भाव कायम असल्याने, निवडणुका घेणे अडचणी आहे. अध्यादेशाद्वारे दिलेली मुदतवाढ पुढील 3 महिन्यांसाठी वाढविण्या संदर्भात अध्यादेशात सुधारणा करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.