पुणे – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज पुण्यात हजेरी लावली. सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाला भेट देऊन त्यांनी डॉ. आंबेडकरांना अभिवादन केलं. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना नारायण राणेंच्या एका विधानाने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.
अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द; प्रतिज्ञापत्रात दिली खोटी माहिती
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले, सूत्रसंचालन करत असताना माझा उल्लेख केंद्रीय मंत्री म्हणून होत असतो. राणे केंद्रात कॅबिनेट मंत्री आहेत, असं सांगितलं जातं. पण व्हाया देवेंद्र फडणवीस आम्हाला सांगितलं जातं की दिल्लीला जा आणि सुखी राहा. आम्ही आदेश पाळला आणि भारतीय जनता पक्षात आदेश पाळतात. मीही आदेश पाळला आणि आज मी सुखी आहे.
देवेंद्र फडणवीसांना उद्देशून बोलत असताना राणे म्हणाले, चार महिन्यात आठ ते नऊ राज्यं फिरत आज पुण्यात आलोय. दर महिन्याला येणारा माणूस चार महिन्याने आलाय. तुमच्या आणि माझ्यातलं अंतर वाढवणारे हे आहेत. राणे असं म्हणताच देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहत हात जोडले आणि सभागृहात एकच हशा पिकला.
बच्चू कडू वादात; बोगस कागदपत्र आणि भ्रष्टाचाराप्रकरणी तक्रार दाखल
सिम्बायोसिस विद्यापीठाच्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते.
Read Also :
- “देवेंद्र फडणवीसांपेक्षा चंद्रकांत पाटलांचीच मुख्यमंत्री होण्याची इच्छा जास्त!”
- “नार्वेकरांचं ‘मातोश्री’शी भांडण झालं की काय?, कळत नाही!”
- खडसे vs महाजन; आगामी निवडणुकीत भाजपचे वर्चस्व राखण्याचे महाजनांपुढे आव्हान
- भाजप नगरसेवकांची सहल, हा आचारसंहिता भंग नाही का?; काँग्रेसचा आक्षेप
- शिवेंद्रसिंहराजेंचा पत्ता कट; सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ नितिन पाटलांच्या गळ्यात