संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीचा पहिला टीझर काही दिवसांपूर्वी ट्विट केला होता. यामध्ये संजय राऊत यांनी एक शरद, सगळे गारद असं म्हटले होते. यावरून विरोधी पक्षाकडून त्यावर जोरदार टोलेबाजी होत आहे. आज नारायण राणे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ असा टोला शिवसेनेला लगावला
नारायण राणे म्हणाले,”“शिवसेनेकडे मुलाखत घ्यायला माणसं नाहीत, असं दिसत आहे. पण किमान ज्यांची मुलाखत घेतली, ते अनुभवी तरी आहेत. आधी ज्यांची घ्यायचे ते सगळं वाचून बसायचे. ‘एक शरद आणि शिवसेनेचे सगळे गारद’ अशी त्यांची स्थिती आहे.” असा टोला नारायण राणे यांनी शिवसेनेला लगावला.
तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवरही टीका केली “जो मुख्यमंत्री मंत्रालयात बसू शकत नाही तो मुख्यमंत्री कशाला हवा, हा मुख्यमंत्री निष्क्रिय आहे,” अशी खरपूस टीका राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती. “शिवसेनेची सत्ता असूनही शिवसेनेचे मंत्री आणि नेते यांचेच ऐकले जात नाही. महाविकास आघाडीत धुसफूस सुरु आहे. शिवसैनिकानाच कोणी विचारत नाहीत, अशी स्थिती आहे.” असंही राणे म्हणाले.