मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं ढवळून निघालं आहे. अशातच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची आता आम्हाला गरज नाही, असं मोठं विधान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केलं आहे. त्यावरून राज्यात एव्हाना देशात वांदग पेटलं आहे.
हेही वाचा..“भाजपला आता संघाची गरज उरली नाही”, जे.पी. नड्डांचं वक्तव्य चर्चेत
जे. पी. नड्डा म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी असताना पक्षाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज होती. त्यावेळी भाजपची क्षमता कमी होती. आता आमची क्षमता वाढली आहे . आम्ही आता आधीपेक्षा सक्षम झालो आहोत भाजपा आता स्वतः स्वतःला चालू शकतो. भाजपा आता मोठा झाला आहे. या पक्षातील नेते कर्तव्य आणि भूमिका निभावत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. भाजप हा राजकीय पक्ष आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वैचारिक पातळीवर काम करतो.
हेही वाचा..संजय काकडेंनी घेतला अटक वॉरंटचा धसका, तक्रारदाराला बोलवून सुपूर्द केला धनादेश
आम्हाला आता आरएस एस ची गरज नाहीय. असं विधान जे.पी. नड्डा यांनी केलीय. त्यावर बोलतांना आंबेडकर म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. ज्या शिडीने वर आले आता तीच शिडी सोडायला तयार आहेत. मी मोहन भागवतांना विचारले होते की, मागच्या दोन वर्षात मोदींनी भेटायला वेळ दिली का ? याचे उत्तर मला अजूनही आलेलं नाहीय. जे. पी. नड्डा यांच्या वक्तव्यावरून सर्व दिसत आहे. भारतीय जनता पक्षाला आता आरएसेस नकोय असा टोलाही त्यांनी लगावला.
उद्या एकनाथ शिंदे यांच्याकडे जी शिवसेना आहे तिचे प्रमुख राज ठाकरे झाले तर आश्चर्य व्यक्त करू नये. नरेंद्र मोदी आणि भाजप यांनी दोन भावंडांमध्ये रेस लावली आहे. लॉयल्टीची रेस लावलेली आहे. मोदी म्हणालेत गरज पडली तर उद्धव ठाकरे यांना सर्वतोपरी मदत करेल आणि दुसरीकडे राज ठाकरे यांना प्रचाराला येण्यासाठी मजबूर करणे, दोन भावंडांमध्ये अधिक लॉयल्टी कोणाकडे यामध्ये चुरस लावलेलीय. लोकसभा निवडणुकीनंतर दोघेही भाजपसोबत असतील असा दावा वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा..ठाकरे अन् केजरीवाल यांच्या भाषणानंतर मुंबईचं वारं फिरलं
हेही वाचा..“रोहित पवारांनी थेट व्हिडीओच आणले,” पंकजा मुंडेंनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…
हेही वाचा..“भाजपकडून मुंबईत कोट्यवधी रूपये लोकांना वाटले”, दानवेंचा खळबळजनक आरोप
हेही वाचा..“आपले अधिकार उध्वस्त झाल्याशिवाय हे गृहस्थ स्वस्थ बसणार नाहीत”, शरद पवारांचा मोदींना टोला