मुंबई : संजय राऊत यांची कालची भांग उतरलेली नाही असं मी म्हणणार नाही. कारण रोजच संजय राऊत नशा करून वक्तव्य करत असतात. अशी टिका खासदार नरेश म्हस्के यांनी राऊतांवर केली आहे. अलिकडेच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आरोप केले होते. त्यावर आता नरेश म्हस्के यांनी राऊतांना चांगलचं सुनावलं आहे. यावेळी नरेश म्हस्के यांनी राऊतांवर प्रश्नांची सरबत्तीही चालवली.
श्रावणी बाळा..!’या नालायक राक्षस लोकांनी ; मुंडेंचा उल्लेख करत शिक्षकाने उचचलं टोकाचं पाऊल
यापुर्वीच एकनाथ शिंदे हे कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, हे पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा, असा दावा राऊतांनी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या कॉंग्रेस प्रवेशाचा खुद्द पृथ्वीराज चव्हाण यांनी इन्कार केला आहे. त्यांनी नकार दिलेला आहे. पण मला संजय राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की, जर तुम्हाला माहिती होतं की एकनाथ शिंदे कॉंग्रेसमध्ये जाणार होते. तर त्यांनी त्यांना नेता का बनवलं ? नगरविकास मंत्री का बनवलं ? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होता का ? उद्धव ठाकरे घाबरत होते का ? असा सवाल म्हस्के यांनी केला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात ; संघटनेकडून रोहित पवारांना सवाल
पुढे बोलतांना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावरती जबाबदारी टाकून तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करत होतात. तुम्ही त्यांना घाबरत होतात, त्यांची लोकप्रियता पाहून तुम्हाला भीती वाटत होती, त्यांची लोकप्रियता आहे हे तुम्हीही मान्य केलं होतं. ते कॉंग्रेसमध्ये जाणार होते असे तुम्ही म्हणताय. एकनाथ शिंदे यांच्याचा मागे सर्व पक्ष का लागले असतील, कारण ते जनतेमध्ये ते फार लोकप्रिय आहेत. ज्या झाडाला फळं लागतात. त्याच झाडाला लोक दगड मारतात, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…३० मतदारसंघात वाढलेल्या मतदारांची कॉंग्रेस चौकशी करणार, प्रदेशाध्यक्षांचा मोठा पुढाकार
हेही वाचा…कोकाट्यांवर निर्णय देण्यास न्यायाधीशांवर RSS चा दबाव आहे का? तीव्र शब्दांत हल्लाबोल
हेही वाचा…धनंजय मुंडेंची सहा महिन्यात आमदारकीही जाणार, करूणा मुंडेंचा मोठा दावा