IMPIMP

ठरलं! नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात, मनसेची पहिली मोठी घोषणा

नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय झाले असून, त्यांनी प्रामुख्याने पुणे आणि नाशिक महापालिकेवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. नाशिकमध्ये मनसेची सत्ता होती, मात्र त्यांना ती राखता आली नाही, यावेळेस मात्र नाशिक महापालिका हातून निसटून दयायची नाही, या उद्देशानेच ते अजेंडा ठरवत आहेत.

चंद्रकांत पाटलांना भाषणाच्या क्लिप पाठवल्या नाही, राज ठाकरे म्हणतात…. 

दरम्यान, या दृष्टीने आता मोठी घडामोड मनसे आणि नाशिकच्या राजकीय पटलावर घडून येत असून, नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर, आता नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची मोठी घोषणा, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. आज प्रसार माध्यमांशी बोलताना, संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली.

राज ठाकरे तीन दिवस पुणे दौऱ्यावर; पण एका मतदारसंघासाठी केवळ एकच तास

आज अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. यावेळी अमित ठाकरे यांनी, मनसेच्या काळात नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची पाहणी केली. तेव्हा या प्रकल्पांची सुधारणा राजकारण बाजूला ठेऊन करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्तांना केली असल्याचे समजते आहे.

राज ठाकरे एकटे महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकत नाहीत – चंद्रकांत पाटील

त्यामुळे, एकीकडे भाजप-मनसे युती होईल, अशी चर्चा घडून येत आहेत, दुसरीकडे राज ठाकरे पुन्हा एकदा पुण्याचा दौरा करणार आहेत, त्यांचा आठवडाभरातला हा दुसरा पुणे दौरा असणार आहे. त्यात आता अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली नाशिक महापालिका निवडणूक लढवली जाणार आहे. एकंदरीतच मनसे पालिका स्तरावर राज्यात मोठी उलथापालथ घडवून आणण्यासाठी आक्रमक झाल्याचे यातून दिसून येत आहे.

Read Also :

Total
0
Shares
Previous Article

"पंकजाताई आता बस्स! जिथे योग्य सन्मान केला जाईल, त्या शिवसेनेत प्रवेश करा", सोशल मीडियावर मोहीम सुरु

Next Article

मोठी बातमी : २५ जिल्ह्यात निर्बंध शिथिल होणार, ११ जिल्ह्यांमध्ये मात्र लेव्हल तीनचे नियम कायम

Related Posts
Total
0
Share