मुंबई : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २४ महामारीने बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यांनतर, राज्य सरकारकडून या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर आज ७ सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समितीने अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आला असून, ही दुर्घटना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे घडल्याचे समितीने या अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारकडून विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली या चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती.
मात्र, या समितीने मुदतीपूर्वीच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून, या अहवालात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याने २४ निष्पाप महामारीने बाधित लोकांना आपला जीव गमवावा लागल्याचे, नमूद करण्यात आले आहे.
विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या उच्चस्तरीय समिती चौकशी समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम करणाऱ्या लोकांचा समावेश होता.