मुंबई : केंद्रिय गृहमंत्री अमित शहा 5 सप्टेंबरला मुंबईत लालबागच्या दर्शनाला येणार आहेत. अमित शहा गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध नेत्यांच्या घरी भेट देणार आहेत. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा मुंबईत येणार असल्याने देशाचे राष्ट्रीय सल्लागार अजित डोवाल हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
“शिवसेनाप्रमुख म्हणून नाही पण प्रमुख नेते म्हणून एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार “; सदा सरवणकर
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी डोवाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री आणि डोवाल यांच्यात यावेळी उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे.
“दानवे यांनी जास्त फडफड करू नये”; शिंदे गटाचा दानवेंना इशारा
अजित डोवाल हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सागर बंगल्यावर भेट घेणार आहेत. शहांच्या मुंबई दौऱ्याविषयीच्या कार्यक्रमाबाबत चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. अमित शहा हे मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहेत. नंतर ते मुख्यमंत्र्याच्या घरच्या गणरायाच्या दर्शनाला जाणार आहेत. भाजपचे नेते आशिष शेलार यांच्या घरच्या गणरायाचे व माझ्या घरच्या गणरायाचे दर्शण घेणार आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
“मोदी सरकार हे भांडवलदारांचे सरकार”; राष्ट्रवादीचा घणाघाती आरोप
वेगवेगळ्या वादग्रस्त विधानांमुळे वारंवार चर्चेचा विषय ठरणाऱ्या राज्यपाल यांच्या घरी अजित डोवाल यांनी भेट घेतली आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी थेट राज्यपाल यांची प्रथम भेट घेतल्याने तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जात असलं, तरी या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावून राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Read also
- “भाजपचे राज्यातील अध्यक्षही अनभिज्ञ, त्यांना माहित झाल्यावर..;”रोहित पवारांचा खोचक टोला
- “शहाजी बापू संत्रा पिऊन बोलतात की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, हेच कळत नाही”
- “ठाकरेंचा मुलगा म्हणून आदित्य ठाकरे मंत्री झाले, ते सध्या बेडकासारख्या उड्या मारताय”; रामदास कदम
- “ज्यांच्याकडे सत्ता असते, ते हव्या त्या गोष्टी करतात”; अजित पवार
- “राज ठाकरेंचा आता कुठेतरी हिंदुत्वाचा मुकवटा खाली उतरला “; शिवसेनेची राज ठाकरेंवर टिका