अमरावती : अपक्ष खासदार नवनीत राणा ह्या वेगवेगळ्या कारणांने सातत्याने चर्चेत राहत आहेत. त्या नेहमी विरोधकांवर आक्रमक शैलीत टिकास्त्र सोडत असतात. तसेच त्यांचा सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग देखील खुप मोठा असतो. यातच त्यांचा मुलांसोबत क्रिकेट खेळताना एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
“शेजारच्या मंत्र्यांनी दम दिला, लगेच दौरे रद्द..! इतकी लाचारी का आणि कोणासाठी?” राष्ट्रवादीचा सवाल
अमरावती येथील अंबिका नगर येथील मुलांसोबत क्रिकेट खेळतांनाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात नवनीत राणा बॅंटिंग करताना दिसत आहे. तसेच बॅटला चेंडू मारल्यानंतर त्या धाव घेण्यासाठी पळत देखील आहेत. ह्या व्हिडीओ त्यांनी आपल्या ट्विटवर अपलोड केला आहे. तसेच त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया देखील मोठ्या प्रमाणात येत आहेत.
“मोदी सत्तेत आल्यानंतर देशात अंधार झाला”; युवा संवाद कार्यक्रमात ‘आप’चा मोदींवर हल्लाबोल
दरम्यान, तसेच सर्वांगीण विकासासोबतच नागरिकांंच्या उत्तम आरोग्यासाठी सातत्याने केंद्र व राज्य सरकारकडे केलेल्या यशस्वी पाठपुराव्याने मंजूर झालेल्या 2.60 कोटींच्या अमरावती शहारातील विविध अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरचे त्यांच्या हस्ते भूमिपुजन करण्यात आले. यावेळी अमरावती विधानसभा क्षेत्राच्या आमदार सुलभा खोडके व मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यासह मनपा अधिकारी, युवा स्वाभिमान पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अंबिका नगर अमरावती येथे मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. pic.twitter.com/UXpUXvoV5L
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) December 5, 2022
Read also
- “आळशी राज्याचं राज्य टिकत नाही,” बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
- “वाचाळवीरांना बुद्धी यावी, यासाठी ठाकरे गटाचं ‘जागरण गोंधळ’ आंदोलन”
- “कोणाची टांग कशी ओढायची, कोणाला कसं पाडायचं, हे मी कबड्डीतून शिकलो”; गिरीश महाजन
- ‘आप युवा संवाद’ मेळावा खेड आळंदी मतदार संघातील राजकीय पटलावरील प्रस्थापितांची झोप उडवणारा: मयुर दौंडकर
- “गडकरींनी गोपीनाथ मुंडेंना जसं ट्रॅपमध्ये अडकवलं, तसेच फडणवीस पंकजा मुंडेंना..” अंधारेंचा गंभीर आरोप