मुंबई – मुंबईत क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यासह भाजप नेत्यांना धारेवर धरले आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांच्यावरही मलिक यांनी अनेक आरोप केले. यानंतर कंबोज यांनी मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. यासंदर्भात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ट्विटच्या माध्यमातून माहिती दिली. दरेकरांच्या या ट्विटला मलिक यांनी प्रत्युत्तर दिले. ‘आ देखें ज़रा किसमें कितना है दम’, असे आव्हान नवाब मलिक यांनी दरेकरांना दिले आहे.
शशीकांत शिंदेंचा पराभव केलेल्या ‘त्या’ रांजणेंचा चंद्रकांत पाटलांनी घरी जाऊन केला सत्कार..
आ देखें ज़रा किसमें कितना है दम @mipravindarekar https://t.co/hjLkJjc3NN
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 30, 2021
लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स; डीजेच्या तालावर धरला जबरदस्त ठेका
दरेकर यांनी काल ट्विटमध्ये म्हटले की , मलिक च्या विरोधात एक हजार कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. त्यांनी उत्तर देण्यासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे, असं ट्विट दरेकर यांनी केले. दरम्यान क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात मलिक यांनी भाजप नेते मोहित कंबोज आणि त्यांच्या मेहुण्यावर आरोप केले आहे. . या आरोपांमुळे माझी आणि माझ्या मेव्हण्याची बदनामी झाल्याचा दावा कंबोज यांनी करत मुंबईतील माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा दावा ठोकला. क्रुझ पार्टी प्रकरणात तब्बल 20 जणांना एनसीबीने ताब्यात घेतले होते . यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. आर्यनची आता जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
Read Also :
- निलंबनाच्या कारवाईवरून खासदार प्रियांका चतुर्वेदींनी व्यक्त केला संताप
- संसदेतील बारा खासदारांच्या निलंबनावरून सुप्रिया सुळे म्हणाल्या… ‘हा’ तर रडीचा डाव
- 12 खासदार निलंबन प्रकरणी संसदेत गदारोळ, लोकसभा आणि राज्यसभेत विरोधकांचा सभात्याग
- “उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला, हिरवा हातात घेतला”; सोमय्यांची घणाघाती टीका
- महाराष्ट्राच्या राजकारणात ट्विस्ट?; ममता बॅनर्जी आजपासून तीन दिवसीय दौऱ्यावर…