पुणे : राज्यातील राजकीय वातावरण सध्या विविध मुद्यांवरून चांगलचं तापत चाललं आहे. यातच मनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये खोचक टिका टिप्पणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. यातच राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी राम नवमीच्या निमित्ताने मनसेवर टिका केली होती. त्यावर आता मनसेचे नेते गजानन काळे यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…संभाजीनगर राडा प्रकरण..! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, ४०० जणांवर गुन्हा दाखल, CCTV फुटेज आलं समोर
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वत: मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित हिंदू जननायक परदेश दौऱ्यावर पळाले. त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे. याला म्हणतात हंस चुनगेगा दाना तिनका. कौआ मोती खायेगा असं म्हणत अमोल मिटकरी यांनी मनसेच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा…“धनुष्यबाण गेला तरी प्रभू श्रीराम माझ्यासोबतच”, उद्धव ठाकरे
अमोल मिटकरी यांच्या टिकेवर मनसेचे नेते गजानन काळे यांनी मिटकरींना खोचक टोला हाणला आहे. गुगलवर घासलेट चोर टाकले की या मटणकरी माकडाची कुंडली दिसते. स्वत: च्या पक्षाच्या अधिवेशनात जाणते राजे हजर होणार त्या दिवशीच याचे सो कॉल्ड दादा परदेशीवारी ला गेले होते विसरला वाटतंय. पण याला काळजी माझ्या नेत्याची. ते म्हणतात ना स्वत: चे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून. असो या औरंगजेबाच्या औलादीच्या तोंडून प्रभू श्रीरामाचे नाव निघाले हेच माझ्या नेत्याचे यश. असं त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा……“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राष्ट्रवादीची प्राथमिकता महाविकास आघाडीला”, जयंत पाटील
दरम्यान, त्यावर परत अमोल मिटकरी यांनी गजानन काळे यांना प्रत्युत्तर दिलं. गज्जा तर ओरिजनल औंरग्याची औल्याद निघाला. गज्या ची सुंदर सकाळ जोरात सुरू आहे. बाहेर पाऊस आणि घरात दुसरीचा स्पाऊस. असं म्हणत मिटकरींना टोला हाणला. त्यावर घासलेट चोरा’ चा घाव खुपच वर्मावर लागला म्हणे औंरग्याच्या औलादीला. रात्री २ पेग घेऊन मटणकरी सैरभैर झाला. वैयक्तिक आयुष्यात डोकाऊ लागलाय. औकातीत रहा बै हैंबाड्या नाहीतर पातूरचं धोतर निसटलं तर अवघड होऊन जाईल ना बे तुले. याचं असं झालंय मी नाही त्यातला आणि कडीकोंडा लावा आतला. असं म्हणत गजानन काळे यांनी देखील त्यावर उत्तर दिलंय.
रामनवमी साजरी करण्याचा आदेश देऊन स्वतः मात्र यामध्ये सहभागी नसणारे तथाकथित “हिंदु जननायक” परदेश दौऱ्यावर पळाले.
त्यामुळे आता राम नवमी बिचाऱ्या कार्यकर्त्यांनाच साजरी करायची आहे…
याला म्हणतात , “हंस चुगेगा दाना तिनका l
कौआ मोती खायेगा ll”— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 30, 2023
गूगल वर “घासलेट चोर”टाकले की या मटणकरी माकडाची कुंडली दिसते.
स्वतःच्या पक्षाच्या अधिवेशनात ‘जाणते राजे’ हजर होणार त्या दिवशीच याचे सो कॉल्ड ‘दादा’ परदेशीवारी ला गेले होते विसरला वाटतंय.पण याला काळजी माझ्या नेत्याची.
ते म्हणतात ना स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून.…— Gajanan Kale (@MeGajananKale) March 30, 2023
गज्या तर ओरिजनल औरंग्याची औल्याद निघाला… गज्या ची सुंदर सकाळ जोरात सुरु आहे,,😆😆 #बाहेर पाऊस आणि घरात दुसरीचा spouse? pic.twitter.com/BE3oITOG08
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 30, 2023
‘घासलेट चोरा’चा घाव खूपच वर्मावर लागला म्हणे औरंग्याच्या औलादीला …रात्री २ पेग घेऊन मटणकरी सैरभैर झाला.वैयक्तिक आयुष्यात डोकाऊ लागलाय … औकातीत रहा बे हेंबाड्या नाहीतर ‘पातूर’चं धोतुर निसटलं तर अवघड होऊन जाईल ना बे तुले 😀… याच अस झालंय
‘मी नाही त्यातला आणि कडीकोंडा लावा… pic.twitter.com/z4RZsKSjCY— Gajanan Kale (@MeGajananKale) March 31, 2023
Read also
हेही वाचा…“..त्यांना न्यायालयीन कार्यवाहीच काहीच समजत नाही”, अन् फडणवीसांनी विरोधी पक्षाला सुनावलं
हेही वाचा…“अशा लोकांना महाराष्ट्रात न ठेवता त्यांना पाच-सात वर्षे बाहेर ठेवायला पाहिजे”, अन् प्रदेशाध्यक्ष संतापले
हेही वाचा…“सरकारमध्येच इच्छाशक्ती नसल्याने अशा संघटनांचे फावते”, नाना पटोलेंनी ‘त्या’ घटनेवर बोट ठेवले
हेही वाचा…“गांधी घराण्याचा अपमान झाला म्हणजे देशाचा अपमान झाला का ?” अमित शहांचा हल्लाबोल
हेही वाचा…““हिंदुत्व सोडल आहे, आता राम नवमी दिवशी तरी राम नाम घ्या”, भाजपचा राऊतांना टोला