पुणे : राज ठाकरे यांना आव्हान देणाऱ्या भाजपचे खासदार बृजभुषण सिंह यांच्यासोबत राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो मनसेकडून पोस्ट केला आहे. तसेच अयोध्या दौऱ्याबाबत राज ठाकरे यांनी म्हटल्याप्रमाणे सापाळा रचण्याच्या कटात शरद पवारांचा हात असल्याचा मनसेकडून आरोप केला जात आहे. त्याला आता राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.
“तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान”; मनसेचा शरद पवारांवर निशाणा
शरद पवारांचा 2018 चा फोटो व्हायरल करून जो संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. असं राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी स्पष्ट केलं आहे. पवार साहेब राज्य कुस्ती संघटनेचे पदाधिकारी आहेत आणि बृजभूषण हेही भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्य आहेत. त्यामुळे भाजपनेच राज ठाकरेंचा गेम केला आहे, असे महेश तपासे म्हणाले.
औरंगाबादमध्ये भाजपचा ‘जल आक्रोश मोर्चा’; देवेंद्र फडणवीस दानवेंचं मोठं शक्तीप्रदर्शन
मनसेकडून केलेला आरोप हा बिनबुडाचा व चुकीचा आहे. मनसेला राजकारणात महत्त्व उरलेले नाही. त्यामुळे वेगवेगळ्या विषयांवर ते बोलत आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. तसेच देशातील खासदार अनेकदा एकमेकांशी बोलत असतात. भेटत असतात. त्यामुळे याचा काहीही अर्थ काढण्यात काही महत्व नाही. उद्या समजा मी योगी आदित्यनाथ यांना भेटलो तर हे म्हणतील की यांना त्यांनी रसद पुरविली, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊतांनीही लगावला.
..तर तुला गृहमंत्र्यांच्या दारी उभं करू, अमरावतीची भाकरवडी
दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शरद पवार आणि बृजभुषण सिंह यांचा कुस्ती आखाड्याच्या एका कार्यक्रमातील फोटो ट्विट केला असून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामागे शरद पवारांचाच हात असल्याचं म्हटलं आहे. त्यावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे.
Read also:
- ‘आधारवड’, पवार साहेब ! काही फोटो चांगले असतात; राष्ट्रवादीने मनसेची केली बोलती बंद
- शिवसेनेने राज्यसभेच्या सहाव्या जागेचा केला फैसला ; खैरेंना डावलून पवारांना दिली संधी
- “बाळासाहेबांवरील राऊतांनी बनवलेला चित्रपट भयानक आपटला, पण दिघे साहेबांवरील अजूनही सुरू”
- धार्मिकतेवरून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..”; गृहमंत्र्यांनी मनसेला फटकारलं
- “ओबीसी हा भाजपचा डीएनए, तर ठाकरे सरकार आरक्षणाचे हत्यारे” फडणवीसांचा ठाकरे सरकारविरोधात एल्गार