पुणे : येत्या 24 जुलैला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि आजी उपमुख्यामंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादी-भाजपत राजकीय फटाके फुटण्यास सुरुवात झाली असून, वाढदिवसानिमित्त कोरोनाचे गांभिर्य लक्षात घेवून “बॅनरबाजी करू नका,” असे आवाहन फडणवीसांनी केले होते.
आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे
मात्र, असे असताना पुण्याच्याच एका पदाधिकाऱ्याने चमकोगिरी करत, फडणवीसांना चक्क ‘पुण्याचे नवे शिल्पकार’ अशी उपमा देऊन पोस्टबाजी केल्याने, पुण्याच्या विकासावरुन भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाई चालू असल्याचं पहायला मिळत आहे.
भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी केले देवेंद्र फडणवीसांना नव्या पुण्याचे शिल्पकार
दरम्यान, या पोस्टरबाजीवरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली होती. “आता तर कमाल झाली. देवेंद्र फडणवीस चक्क पुण्याचे शिल्पकार. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त,” अशी खोचक टीका त्यांनी केली होती.
आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असु शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त.😄 pic.twitter.com/AnEnUg3CGV
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 19, 2021
रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
त्यांच्या या ट्विटला आता, भाजपचे आमदार राम सातपुते यांनी ट्विटनेच जोरदार प्रत्त्युतर दिलं आहे. “मिटकरी तब्येतीची काळजी घ्या, तोंडाला लकवा झाला होता ना आपल्या? साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाला शिल्पकार शब्द काय कळणार? आपण तर प्रख्यात बाजारू धंदेवाईक विचारवंत आहात, त्यामुळे तुमचा आणि त्या शब्दाचा संबंध नसणारच. तोंडाला गावरान गाईचे तूप लावा फरक पडेल,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.
मिटकरी तब्येतीची काळजी घ्या तोंडाला लकवा झाला होता ना आपल्या ?साडेतीन जिल्ह्याच्या पक्षाला शिल्पकार शब्द काय कळणार ?
आपण तर प्रख्यात बाजारू धंदेवाईक विचारवंत आहात त्यामुळे तुमचा आणि त्या शब्दाचा संबंध नसणारच.
तोंडाला गावरान गाईचे तूप लावा फरक पडेल.@amolmitkari22 @Dev_Fadnavis https://t.co/5kTKc2kq4W— Ram Satpute (@RamVSatpute) July 20, 2021
अकोल्याच्या एका कार्यक्रमात अमोल मिटकरी छक्कड गात असताना, त्यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला आणि तातडीने त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. यानंतर ३ दिवस त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरु होते आणि त्यानंतर त्यांना रूग्णालयातून सोडण्यात आलं. यानंतर त्यांनी या पोस्टबाजीवर टीका केली आहे.
Read Also :
- धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड
- पंकजांना डावलून प्रदेश भाजपची जोरदार बैठक; प्रश्नांची झोड उठताचं प्रवक्त्यांकडून पांघरण घालण्याचा प्रयत्न
- आषाढीदिनी पंतप्रधान मोदींची विठ्ठल चरणी प्रार्थना; म्हणाले वारकरी चळवळ ही…
- राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर, राजकीय पक्षांना धक्का
- “काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप