बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, बारामतीतील त्यांच्या ‘गोविंद बाग’ या निवासस्थानी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
“सत्तेत काँग्रेसला कुणी विचारत नाही आणि काँग्रेसमध्ये नाना पटोलेंना!”
“पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे बारामतीचे, मात्र कोणत्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या ते कामाला येत नाहीत. तर आपल्याला काही बोलायचंच नाही. ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, एकत्र राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल, त्या त्रासालाच तुम्ही आपली ताकद बनवा,” असा हल्लबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांच्यावर केला होता.
संजय राठोड यांचं होणार पुनर्वसन? मंत्री मंडळातल्या प्रवेशाबद्दल म्हणाले…
या पार्श्वभूमीवर आज पत्रकारांनी पवारांना प्रश्न विचारला, तेव्हा “या गोष्टीत मी काही पडत नाहीत. नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी बोलणार नाही. सोनिया गांधी बोलल्या असत्यात तर भाष्य केलं असतं,” अशी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेनेकडून ऑफर? उज्ज्वल निकम यांनी दिली प्रतिक्रीया
काल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना, नाना पटोले यांनी, ”काँग्रेस स्वबळावर लढणार, मी अनेकदा बोललो आहे. मी आता माघार घेणार नाही. या स्वबळाच्या लढाईला आपण कामाला लागा. मुख्यमंत्र्यांनीही आपल्या शिवसैनिकांना हेच सांगितलं आहे, पण सगळ्यांना मीच दिसतो,” असं शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. पण, शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचंच यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे.
Read Also :
- सहकार हा विषय राज्य सरकारचाच, महाराष्ट्रात गंडांतर येणार नाही
- “गैरसमजात राहू नका, माझं तिकीट कुणीही कापू शकत नाही”
- “एकतर सगळे निर्बंध कायमचे काढून टाका किंवा संपूर्ण लॉकडाऊन करा!”
- भाजपला सर्वात मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेत जाणार, राजकीय चर्चेला उधान
- सोबत राहून पाठीत सुरा खुपसायचा आणि बोलायचे नाही; नाना पटोले यांची शिवसेना-राष्ट्रवादीवर टीका