मुंबई : देशात महामारीची दुसरी लाट वेगानं फैलावत असतानाच, अनेक राज्यांमध्ये वैद्यकीय सोयी-सुविधांची वानवा जाणवत असल्याचे भीषण चित्र दिसून येत आहे. यामुळे दुर्दैवाने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून, देशभरात जाणवत असलेल्या या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान सहायता निधीमधून राज्यांना नुकतेच अद्ययावत व्हेंटिलेटर्सचे वितरण करण्यात आले आहेत.
दरम्यान, या अत्याधुनिक व्हेंटिलेटर्समध्ये अनेक दोष आढळले असून आहेत, यामुळे ते वापराविना पडून असल्याची माहिती अनेक ठिकांणांहून मिळत आहे. यांचा वापर करणे घातक असून, असे व्हेंटिलेटर वापरण्यासाठी अयोग्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यावरून राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीने पीएम केअरच्या माध्यमातून मिळालेल्या निकामी व्हेंटिलेटर प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावरून केंद्र सरकारला धारेवर धरले असून, “पीएम केअरच्या माध्यमातून मराठवाड्याला मिळालेल्या १५० व्हेंटिलेटरपैकी ११३ व्हेंटिलेटर तांत्रिक दृष्ट्या सदोष निघाल्याची बातमी ऐकली. यामुळे केंद्रीच्या आरोग्य विभागाच्या एकंदरीत ढिसाळ कारभारा आणि नियोजनाची माहितीहोत असून, त्यावर गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. याची सखोल चौकशी व्हायलाच हवी. या मागचा खरा सुत्रधार कोण ? कोण गैरफायदा घेत आहे ? याचा शोध लागायला हवा,” असं जयंत पाटील यांनी ट्विट करत म्हटले आहे.
This issue needs to be investigated end to end. Questions have arisen about the process of procurement of these ventilators by @MoHFW_INDIA. Why wasn't proper QC mechanism followed? People with vested interests behind it should be immediately identified. https://t.co/pKsl3jvh78
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 26, 2021
Read Also :
- १० आजी – माजी नगरसेवकांनी ठोकला भाजपला रामराम, केला शिवसेनेनेत प्रवेश
- ‘नारायण राणे पनवती, म्हणूनच भाजपत त्यांना अडगळीचं स्थान’
- पदोन्नतीतील आरक्षणाचा जीआर रद्द न केल्यास, काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार
- लसीकरणाची निविदा प्रक्रिया टक्केवारीत अडकली का?
- ‘…तोवर राज्यातल्या लॉकडाऊन मध्ये कोणताही दिलासा नाही’, ठाकरे सरकार घेऊ शकतं निर्णय