मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतेच तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एक सूचक विधान केलं. राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढतेय. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. या विधानावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. मात्र सुप्रिया सुळेंच्या या विधानाने शिवसेनेच्या नाकाला मात्र मिरच्या झोंबलेल्या दिसत आहेत.
जेव्हा-जेव्हा महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्र्याची चर्चा होते, त्यावेळी सुप्रिया सुळे यांच नाव आघाडीवर असतो. आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असून, या चर्चेला शिवसेनकडून उत्तरही देण्यात आलं आहे. खुद्द शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची देखील सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानावर नाराजी असलयाचे दिसून आले.
“साई रिसॉर्टशी काहीही संबंध नाही, मग हा रिसॉर्ट कुणाचा”? सोमय्यांचा अनिल परबांना सवाल
“उद्धव ठाकरे सध्या मुख्यमंत्री असून हेच २५ वर्ष मुख्यमंत्री राहतील असं सुप्रिया सुळेंचं म्हणणं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात असे संभ्रम काही लोक निर्माण करत असतात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सोनिया गांधी, राहुल गांधी हे सर्वजण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर आनंदी आहेत. त्याच्यामुळे कोणी प्रश्न निर्माण केला असेल तर त्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे,” असं संजय राऊत म्हणाले. म्हणजेच संजय राऊत यांनी मुख्यमंत्रीपदाच्या बदलाबाबतच्या चर्चा फेटाळून लावल्या.
“बंद पडलेल्या कारखान्याला धुऊन खाण्याचे काही लोकांचे काम”; शरद पवारांचा रोख नेमका कुणाकडे ?
तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांच्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा होत असल्याचा प्रश्नाला उत्तर देतांना शिवसेनेचे नेते तथा महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी खोचक टोला लगावला.”पुढील २५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच राहतील त्यामुळे सुप्रिया सुळे यांना २५ वर्षांनंतर मुख्यमंत्री होण्यासाठी माझ्या शुभेच्छा”. ते म्हणाले की, महिला मुख्यमंत्री करायच्याच असेल तर मी यापूर्वीच नाव सुचवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंना महिला मुख्यमंत्री करावे असं सत्तार म्हणाले. तसेच उद्धव ठाकरे 25 वर्षे मुख्यमंत्री राहावे यासाठी यापूर्वीच मंदिरात पूजा झाली आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचा 25 वर्षांनंतर नंबर लागावा अशीच आमची देवाला प्रार्थना राहील,असं सत्तार म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीत MIM अन् वंचितने भाजपकडून 1 हजार कोटी रूपये घेतले; चंद्रकांत खैरे
दरम्यान खासदार सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या विधानाने शिवसेनेत नाराजी नाट्य सुरु असल्याने राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा अशी शिवसेनेची इच्छा नाही की राष्ट्रवादी शिवसेनेचा मुख्यमंत्री नको? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तर आंबाबाईच्या आशीर्वादाने पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काॅंग्रेसचा झाला तर संपुर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईल, असा नवस राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतला. त्यामुळे त्यांच्यावर सध्या अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. मात्र यात आणखी एक ठिणगी पडली ती म्हणेज मनसे नेते गजानन काळे यांच्या वक्तव्याने.
“मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?
पुढची २५ वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असणार असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणताहेत. तर पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी कॉंग्रेसचा होऊ दे ,नवस फेडणार असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. मग काँग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार ? असा खोचक सवाल मनसे नेते गजानन काळे यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या विधानावरून भविष्यात त्यांना सेनेचा मुख्यमंत्री नको असे चित्र दिसतंय. गजानन किर्तीकर, खासदार संजय जाधव, श्रीकांत शिंदे व इतर सेना नेते राष्ट्रवादीबद्दल उघड नाराजी बोलून दाखवू लागले आहेत. लाचार संजय राऊत तरी राष्ट्रवादीची तळी उचलण्यात मग्न आहेत. अशी टिका देखील त्यांनी केली आहे.
दरम्यान मुख्यमंत्रीपदाबाबत होणाऱ्या या राजकीय चर्चांमध्ये काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देण्याबाबत महाविकासआघाडीतील कोणत्याही नेत्याने वक्तव्य केले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाची नाराजी समोर येईल का? तसेच मनसेने टाकलेल्या ठिणगीवर आता शिवसेना , राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसकडून कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात. ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- एकेकाळी भाजपवर गरळ ओकणारा पाटीदार नेता हातात ‘कमळ’ घेणार ; 2 जुन रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार?
- “दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
- “25 वर्ष सेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीसाठी सुप्रिया सुळे यांचं नवस, मग काॅंग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार?”
- पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
- “शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार