मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गेल्या कित्येक महिन्यांपासून, भाजपविरोधी पक्षाची मोट बांधण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांनी गेल्या काही महिन्यांत अनेकदा दिल्लीवारी केली आहे. या पार्श्वभूमीवर आता एक मोठी घडामोड घडून येत असून, आगामी उ.प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी-समाजवादी पक्षाने आघाडी करण्याचे संकेत दिले आहेत.
नरेंद्र मोदी-अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला; राहुल गांधीचा पेगाससवरून हल्लाबोल
याबाबत मंगळवारी लखनऊ येथे पत्रकार परिषदे घेऊन अधिक माहिती देताना, राष्ट्रवादीचे सरचिटणीस के.के. शर्मा आणि स.प.प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी, “उ.प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी, राष्ट्रवादीकडून स्थानिक मुख्य विरोधी पक्ष असलेल्या स.प.च्या नेतृत्वात, इतर विरोधी पक्षांची देखील मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्र आणि प.बंगालचीच इथे देखील पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे त्यांनी सांगितले.
“फडणवीसांनी उठसूठ बोलण्यापेक्षा अभ्यास आणि संशोधन करून बोलावं”
दुसरीकडे, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या देखील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. मंगळवारी त्यांनी पेगॅसस मुद्द्यावर मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच, या प्रकरणी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची आणि सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची देखील त्यांनी मागणी केली. आज त्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी काँग्रेस सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या झालेल्या मुंबई आणि दिल्लीतील भेटीत देखील या मुद्द्यवारून सखोल चर्चा झाल्याची शक्यता सांगण्यात येत आहे. त्यामुळे, शरद पवार येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत सगळीकडे भाजपला सत्तेत येण्यापासून थांबवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- मिशन यूपी इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशभरातील ओबीसी विद्यार्थ्यांना देणार मोठा दिलासा
- मोदी सरकारला देशाची तरुणाई २०२४ मध्ये उलथवून लावेल!
- कोकणसाठी कटू निर्णय घेण्याची गरज, ६ जिल्ह्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
- राज्यपाल कोश्यारींकडून ठाकरे सरकारचे कौतुक, महापुराच्या संकटात उत्तम कामगिरी
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर सातारा दौऱ्यावर, पूर परिस्थीतीची करणार पहाणी