“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. असं म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते नाशिकमधील सिडको परिसरात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे कोविड रुग्णालयाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“प्रभू रामचंद्र कोणाच्या सातबारावर नाहीत. तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावे राजकारण करणं वेगळं आणि भक्ती करणं वेगळं. ज्याच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, ज्याच्या मनात आई-वडिलांबद्दल आत्मीयता आहे, ज्याच्यात मर्यादा आहेत, त्याच्यात कुठेतरी राम लपलेला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राम असं आपण म्हणतो…त्यामुळे हे भूमिपूजन करत आहेत त्याचं एवढं काही नाही…त्यांना वाटतंय ते करत आहेत,” असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.