मुंबई : भाजपतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले आणि सध्या ईडीचा ससेमिरा मागे असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, हे आठवडाभरापासून रुग्णालयात आहेत. मुंबईतल्या बॉम्बे हॉस्पिटल येथे त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात हॉस्पिटल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. खडसेंना कमरेचा व गुडघेदुखीचा त्रास आहे. मात्र मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं आहे.
दरम्यान, भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणी खडसे यांची ईडीकडून चौकशी केली जात असून, त्यांच्या जावयाला याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. तसेच, त्यांच्या पत्नीलाही ईडीकडून नोटीस बजावण्यात आली आहे. खडसे यांच्यावर या प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ ला गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे सादर केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
“ही नरेंद्र मोदींची पत्रकार परिषद”, पंतप्रधान मोदींवर काँग्रेसची बोचरी टीका
दरम्यान, गेल्या महिन्यात ईडी चौकशीला जाण्याआधी खडसेंनी, “ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत आहे. भाजप सोडल्यापासून माझ्यामागे चौकशी लावली जात आहे. या चौकशीचा आता मला संशय येत आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगावमधील काही Whatsapp ग्रुपवर “कुछ तो होनेवाला है” असा मॅसेज फिरत आहे. मी राष्ट्रवादीत गेल्याने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे”, असा खळबळजनक आरोप केला होता.
Read Also :
- प्रदेशाध्यक्ष बदलीवरून चंद्रकांत पाटील म्हणतात, “भाजप प्रदेशाध्यक्ष बदलणार पण…”
- लवकरच येईन! महिनाभरापासून राज्य सरकारचे वाभाडे काढले नाहीत, राणेंचा महाविकास आघाडीला इशारा
- भाजपत अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाने गाठले टोक, शहर भाजपची टीम दिल्ली दरबारी दाखल
- शिवसेना पर्वती मतदार संघाच्या आंदोलनाला अखेर यश; जनता वसाहत मधील लसीकरणाला येणार वेग
- “पुण्याचा विकास फडणवीसांच्या सवडीनुसार नाही तर अजित पवारांच्या गतीने होणार”, चाकणकरांचा टोला