मुंबई : भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जहरी टिका केली आहे. संजय राऊत हा महाविकास आघाडीचा गौतमी पाटील असल्याचा टोला हाणला. त्यावर आाता नितेश राणे हा भाजपचा नाच्या असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे. त्याचबरोबर रूपाली पाटील यांनी भाजपवरही टिका केली आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होणार ? अपात्रतेच्या कारवाईला वेगाने हालचाली
भाजपने आजकल राजकारणाचा स्तर खाली आणला आहे. संजय राऊत यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली की, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी किंवा मनोरंजन करण्यासाठी नितेश राणे पत्रकार परिषद घेत आहेत. परंतु नितेश राणे यांनी गौतमी पाटील हिची तुलना का करायची? गौतमी पाटील ही स्वत:च्या व्यवसायसाठी काम करतेय. तिच्या काही चुका होत्या. त्या आपण सांगितल्या होत्या. अशा पद्धतीने तुम्हाला महिलांना हिवण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवालही रूपाली पाटील यांनी नितेश राणे यांना केला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसमधून निलंबित, फडणवीसांच्या भेटीनंतर भाजपात येण्याच्या बातम्या, आशिष देशमुख म्हणाले, “माझी राजकीय आता वाटचाल…”
दरम्यान, जर नितेश राणे म्हणत असतील की संजय राऊत महाविकास आघाडीचे गौतमी पाटील आहे. तर मग टिल्लू भाऊ तुम्ही भाजपचे नाच्या आहात का ? असा खोचक सवाल करी त रूपाली पाटील यांनी नितेश राणेंना खणखणीत टोला हाणला आहे. भाषा जपून वापरली पाहिजे. फडणवीस साहेबांमध्ये थोडी तरी सभ्यता राहिली असेल तर असे वाचाळवीर, काय कामाचे ? असा सवालही त्यांनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“भाजप ही अजगर, मगरीसारखी..!सोबत गेलेल्यांना भाजपाने खाऊन टाकले”
हेही वाचा…तयारीला लागा…! “पुणे लोकसभा पोटनिवडणुक लवकरच लागणार,” अजित पवारांनी दिले संकेत
हेही वाचा…“संजय राऊत हे महाविकास आघाडीतील गौतमी पाटील,” भाजप आमदाराची राऊतांवर जहरी टिका
हेही वाचा…आपची ‘महाराष्ट्रात’ जोरदार धडक..! राज्यात ‘स्वराज्य यात्रेचं आयोजन, सहभागी होण्याचं मुयर दौंडकरांचं आवाहन
हेही वाचा…“कुणी कितीही दावा केला तरी आम्ही जागा लढविणार,” बच्चू कडूंनी नवनीत राणांच्याविरोधात शड्डू ठोकला,