राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणात सर्वांनाच धक्का देणारा निर्णय आज जाहीर केला आहे. ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या आवृत्तीचे प्रकाशन आज करण्यात आले. यावेळी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त होणार असल्याची घोषणा शरद पवार यांनी केली. ही घोषणा होताच ज्येष्ठ नेत्यांना देखील अश्रू अनावर झाले.
आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपद सोडणार असून यापुढे कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचा देखील शरद पवार यांनी घोषित केल आहे. पवार यांनीही घोषणा करतात सर्व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आपण हे पद सोडू नये अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्वाची आपल्या सर्वांना गरज आहे. त्यांना असा परस्पर निर्णय घेण्याचा अधिकार नाही, आम्ही सर्वजण विनंती करतोय की त्यांनी हा निर्णय बदलावा, असे म्हणत जयंत पाटील यांना अक्षरश रडू कोसळले.